nmc.
nmc. 
नागपूर

सत्ताधारी आता कसे घेरणार तुकाराम मुंढेंना?मनपाची सभा होणार व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : गेला आठवडा उपराजधानीत सत्ताधारी विरुद्ध आयुक्‍त या वादाने चांगलाच गाजला. दोघांनीही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फै री झाडल्या. या काळात सदस्यांकडून सोशल डिस्टिन्सिंगचा फज्जा उडत असल्याने राज्य सरकारने महापालिकेसह इतरही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वसाधारण सभेबाबत नवे आदेश काढले आहेत.

नव्या आदेशानुसार महापालिकेची सर्वसाधारण सभा व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारेच घेता येणार आहे. सर्वसाधारण सभा व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बंधनकारक झाल्याने सत्ताधाऱ्यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले गेले आहे.

मागील आठवड्यात महापालिकेची सर्वसाधारण सभा पार पडली. सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे म्हणून ही सभा रेशीमबाग येथील दोन हजार आसनाच्या सुरेश भट सभागृहात घेण्यात आली. पाच दिवस ही सभा सुरू होती. यादरम्यान सोशल डिस्टिन्सिंगचा अनेकदा फज्जा उडाला. या सभेत महापालिकेतील सत्ताधारी तसेच विरोधी बाकावरील नगरसेवकांनीही आयुक्तांना लक्ष्य केले. सभागृहानेही आयुक्तांच्या नियमबाह्य कामांवर बोट ठेवत त्यांना स्पष्टीकरण मागितले.

आता पुढील महापालिकेची सभा व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घ्यावी लागणार आहे. याबाबत काल, शुक्रवारी राज्य सरकारने आदेश काढले. त्यामुळे पुढील सभा घेऊन पुन्हा आयुक्तांना त्यांच्या कामांवरून घेरण्याच्या सत्ताधाऱ्यांच्या मनसुब्यांना जोरदार धक्का बसला आहे. केवळ सभाच नव्हे तर महापालिकेत शहर विकासाबाबत आर्थिक नियोजनाची जबाबदारी असलेल्या स्थायी समितीचीही बैठक व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घ्यावी लागणार आहे.

या बैठकी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार असल्याने सत्ताधाऱ्यांकडून अधिकाऱ्यांवर तोंडसुख घेण्यावर नियंत्रण येणार आहे. याशिवाय परिवहन, दुर्बल घटक, स्थापत्य, आरोग्य, कर आकारणी, शिक्षण, जलप्रदाय, अग्निशमन, महिला व बाल कल्याण, गलिच्छ वस्ती निर्मुलन, क्रीडा, विधी या समितीची बैठकही ऑनलाईन व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारेच घ्यावी लागणार आहे.

अधिकाऱ्यांना दिलासा
स्थायी समितीसह विविध समित्यांच्या बैठकीत अधिकाऱ्यांना थेट धारेवर धरणे शक्‍य होते. मात्र, व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीमुळे समिती सभापती, सदस्यांच्या रोषावर मर्यादा येणार आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी बिभव कुमारला पोलिसांनी घेतले ताब्यात

Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 74,005 वर, कोणते शेअर्स वधारले?

Viral Video: किर्गिस्तानमध्ये हिंसाचार चार पाकिस्तानी विद्यार्थी ठार; भारतीय विद्यार्थीही ठरले लक्ष्य

Online Vegetable Shopping : Blinkit भाजी खरेदीवर फ्री कोथिंबीर घेण्यास नकार! नेटकऱ्यांनी केली 'ही' मागणी

शरद पवारांना धक्का! 'या' नेत्याची 'राष्ट्रवादी'ला सोडचिठ्ठी; शिंदे म्हणाले, हातातोंडाशी आलेल्या मुलानं कायमस्वरूपी..

SCROLL FOR NEXT