oxygen 
नागपूर

ऐकावे ते नवलच! सरकारी कार्यालयात नाही एकही कर्मचारी, काय आहे कारण?

राजेश चरपे

नागपूर : महापालिका आणि नागपूर पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील नागरिकांच्या ऑक्सिजन तपासणीसाठी सर्वच सरकारी कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांना सहभागी होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे शुक्रवारी कर्मचारीच शिल्लक नसल्याने जवळपास सर्वच सरकारी कार्यालयांचा कारभार बंद होता.

कोरोनामुळे फक्त १५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावर बोलावण्यात येते आहे. त्यातही त्यांना ऑक्सिजन चाचणीसाठी जुंपण्यात आले आहे. त्यामुळे राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात दिवसभर एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. विशेष म्हणजे पोलिस ठाण्यातून सर्व कर्मचाऱ्यांना सूचना देऊन उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रत्येकाला फोन करून ठाण्यात बोलाविले जात आहे.

ठाण्यातून सातत्याने फोन येत असल्याने हातचे काम सोडून कर्मचाऱ्यांना ठाणे गाठावे लागले. शहरात एकूण २८ पोलिस ठाणे आहेत. सकाळी सरकारी कार्यालयांमध्ये कोणाला कुठले ठाणे मिळाले याचीच चर्चा होती. विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनाही बोलविण्यात आले आहे. ज्यांची बदली इतरत्र झाली आहे, त्यांच्याऐवजी जो रुजू झाला त्याने ऑक्सिजन तपासणीसाठी यावे असेही आदेश काढण्यात आले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मधुमेह, रक्तदाब आदी विकाराने ग्रस्त ज्येष्ठ नागरिकांचे व ज्यांना मधुमेह, उच्चरक्तदाबा सारखे आजार आहे त्यांच्या ‘ऑक्सिजन पातळीची चाचणी करण्यात येणार आहे. महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलिस कर्मचारी यांच्यासह स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी घरोघरी जाऊन तपासणी करणार आहेत.

सुरक्षेचे काय
आम्हाला घरोघरी जाऊन ऑक्सिजन तपासणी करण्यास सांगण्यात आले आहे. कोरोनाच्या काळात अत्यावश्यक कामे वगळता कोणीही घराबाहेर पडू नये असे आवाहन केले जात आहे. दुसरीकडे गटागटाने लोकांच्या घरी जायला सांगण्यात येत आहे. याकरिता कुठल्याही सुविधा पुरवण्यात आल्या नाहीत. या दरम्यान कोणाला कोरोनाची लागण झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार असा कर्मचाऱ्यांचा सवाल आहे.

संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar : जागावाटपाचा तिढा सुटेना, नेत्यानं दोन पक्षाकडून एकाच मतदारसंघात भरला अर्ज

Criminal Killed Police : कुख्यात गुंड युनूस पटेलचा पाठलाग करून एन्काउंटर, १२ गंभीर गुन्हे दाखल

तिकिटासाठी २.७ कोटी मागितले! नेत्याचा आरोप, माजी मुख्यमंत्र्यांच्या दारात कपडे फाडून घेत जमिनीवर लोळला

Latest Marathi News Live Update : पाळीव जर्मन शेफर्ड श्वानाने केलेल्या हल्ल्यात चिमुकला मुलगा गंभीर जखमी

Raj Thackeray : महाराष्ट्रात नवे ९६ लाख खोटे मतदार, आगामी निवडणुकांचा निकाल आधीच ठरलाय; राज ठाकरेंचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT