No business of school bus Van drivers as schools are closed due to corona  
नागपूर

तब्बल सात हजार स्कूल व्हॅनची चाके थांबली; १३ महिन्यांपासून बेरोजगार; कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ

नरेंद्र चोरे

नागपूर : दररोज प्रामाणिकपणे शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करून आपल्या मुलाबाळांचे पोट भरणाऱ्या उपराजधानीतील तब्बल सात हजारांवर गोरगरीब स्कूल व्हॅनचालकांवर कोरोनाने उपासमारीची वेळ आणली आहे. गेल्या १३ महिन्यांपासून त्यांची वाहने जागेवर उभी असून, बेरोजगारीमुळे जीवन जगणे कठीण झाले आहे.

स्कूल व्हॅनचालकांच्या व्यथा मांडताना स्कूल व्हॅनचालक संघटनेचे विदर्भ अध्यक्ष अफसर खान म्हणाले की, गतवर्षी १६ मार्चला लॉकडाउन लागल्यानंतर सर्व शाळा बंद झाल्या. तेव्हापासून सर्वांच्या व्हॅन घरीच आहेत. विद्यार्थ्यांना ने-आण करण्याचीच परवानगी असल्यामुळे प्रवासी वाहतूकही करू शकत नाही. त्यामुळे १३ महिन्यांपासून सर्व जण बेरोजगार झाले आहेत. काहींनी छोटामोठा व्यवसाय सुरू करून पोटापाण्याची सोय केली. तर, बहुतांश चालक बेरोजगार होऊन घरीच बसले आहेत. 

हाताला काम व उदरनिर्वाहाचे दुसरे साधन नसल्यामुळे बहुतेकांचे खायचे वांधे आहेत. सात-आठ महिने विद्यार्थ्यांची ने-आण केल्यानंतर होणाऱ्या कमाईवर उन्हाळ्यातील दोन-तीन महिने काढतो. जवळची जमापुंजी संपल्याने सध्या एकेक दिवस काढणे कठीण जात आहे. अडचणीच्या काळात जगण्यासाठी शासनाकडून आम्हाला दरमहा किमान पाच हजार रुपयांची मदत मिळावी आणि वाहनांवरील बँकांच्या मासिक हप्त्यांना डिसेंबर २०२१ पर्यंत स्थगिती द्यावी, अशी आमची मुख्य मागणी आहे.

हप्ते कसे फेडणार?

अनेकांनी बँका व अन्य वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊन व्हॅन खरेदी केल्या. गेल्या एक वर्षापासून हप्ते थकले आहेत. हप्ते फेडायचे, घरभाडे द्यायचे की बायका-पोरांना पोसायचे, अशा अडचणीत सध्या व्हॅनचालक सापडले आहेत. शिवाय, आर्थिक अडचणीमुळे अनेकांनी गाड्यांचे इन्शुरन्स, टॅक्स, पासिंग व परमिटचे पैसेही भरले नाहीत.

अर्धा डझन चालकांच्या आत्महत्या

गरिबीचे चटके व आर्थिक संकटामुळे निराश होऊन गेल्या वर्षभरात नागपूर जिल्ह्यात जवळपास सहा ते सात स्कूल व्हॅनचालकांनी आत्महत्या केल्याची माहिती अफसर खान यांनी दिली. कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर झाले नाही आणि सरकारने उपाययोजना केल्या नाही तर भविष्यात आणखी आत्महत्या होऊ शकतात, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्र्यांसह अनेकांना निवेदने

अफसर खान म्हणाले की, आम्ही आमच्या समस्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नाना पटोले व आमदार विकास ठाकरे यांच्यापुढे मांडल्या. जिल्हाधिकारी व आयुक्तांनाही वारंवार निवेदने दिली; मात्र कुणाकडूनच सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.

अशी आहे स्थिती

- शहरी व ग्रामीण भागात अंदाजे ७ हजारांवर स्कूल व्हॅनचालक
- सुमारे २५ ते ३० हजार सदस्य अवलंबून
- दर महिन्याची कमाई अंदाजे १० ते २५ हजार
- मार्च २०२० ते एप्रिल २०२१ स्कूल व्हॅन पूर्णपणे बंद
-ग्रामीण भागात ६-७ स्कूल व्हॅनचालकांच्या आत्महत्या

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Cyclone Alert After Motha: मोंथा नंतर नवीन चक्रीवादळाचा इशारा! हवामान परिस्थिती आणखी बिकट होण्याची चिन्ह

Sunny Fulmali : झोपडीतून सुवर्णशिखराकडे! लोहगावचा सनी फुलमाळी ठरला खऱ्या अर्थाने ‘गोल्डन बॉय’

Navneet Rana Hospitalized : माजी खासदार नवनीत राणा रूग्णालयात दाखल; २५ दिवस 'बेडरेस्ट' असणार!

Raju Shetty: ''उद्यापासून एकही साखर कारखाना चालवू देणार नाही'' प्रशासनासोबतची शेट्टींची बैठक निष्फळ

PM Modi Meet Indian Women Cricket Team : विश्वविजयी महिला क्रिकेट संघासोबत पंतप्रधान मोदी करणार 'ब्रेकफास्ट'? , भेटीची तारीख ठरली!

SCROLL FOR NEXT