no confidence motion against sarpanch of jawarabodi grampanchayat in bhiwapur of nagpur 
नागपूर

सद्स्यांसोबत ग्रामस्थांनीही नाकारले, हातचे पद गमावले अन् आनंदावर पडले विरजण

सकाळ वृत्तसेवा

भिवापूर (जि. नागपूर ) : जवराबोडी गट ग्रामपंचायतच्या सरपंचाविरुद्धच्या अविश्वास प्रस्तावावर रविवारी ग्रामसभेत घेण्यात आलेल्या मतदानात प्रस्तावाच्या समर्थनात ६१ मते अधिक पडल्याने सरपंचाला पायउतार व्हावे लागले. झालेल्या एकूण ३६९ मतदानापैकी प्रस्तावाच्या बाजूने २११, तर विरोधात १५० मते पडलीत. 

सरपंच अशोक गोंगल यांच्याविरुद्ध नाराजी असल्याने ग्राम पंचायत सदस्यांनी त्यांच्याविरुद्ध तहसीलदारांकडे अविश्वास प्रस्तावाची मागणी केली होती. या मागणीच्या आधारावर गत १९ जानेवारीला ग्राम पंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करून अविश्वास प्रस्तावावर मतदान घेण्यात आले. यात सातपैकी सहा सदस्यांनी प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे प्रस्ताव पारीत झाला. परंतु, सरपंच हे जनतेमधून निवडून आलेले असल्याने ग्रामसभेत अविश्वास प्रस्तावावर मतदान घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. या आदेशानुसार शुक्रवारी (ता.५) ग्राम पंचायत कार्यालयात ग्रामसभेचे आयोजन करुन अविश्वास प्रस्तावावर मतदान घेण्यात आले. जवराबोडी व किन्हाळा येथील ३६९ मतदारांनी निवडणुकीत भाग घेवून मतदान केले. प्रस्तावाच्या बाजूने २११ तर विरोधात १५० मते पडलीत. ८ मते अवैध ठरविण्यात आलीत. प्रस्तावाच्या बाजूने ६१ मते अधिक पडल्याने अविश्वास प्रस्ताव पारीत होऊन सरपंच गोंगल यांना पायउतार व्हावे लागले. 

अविश्वास प्रस्तावाची खेळी -
गावाला लागून ग्राम पंचायतच्या मालकिची जवळपास साडेसहा एकर जमीन आहे. या जमिनीवर गावातील काहींनी बेकायदेशीर कब्जा करुन ती बळकावली आहे. सरपंच अशोक गोंगल यांनी ही जमिन अतिक्रमणमुक्त करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रयत्न चालविले होते. ही बाब गावातील काही धुरीणांच्या पचनी पडली नाही. त्यातूनच मग अविश्वास प्रस्तावाची खेळी खेळण्यात आली. प्रस्ताव नामंजूर होऊ नये, यासाठी वरील धुरीणांनी मोठ्या प्रमाणात धनशक्तीचा वापर केल्याचे समजते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : एका सक्षम पथकाची नियुक्ती केली आहे आणि सखोल चौकशी सुरू आहे - अहिर

SCROLL FOR NEXT