नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या (RTM nagpur university) विधी महाविद्यालय परिसरात असलेल्या आरोग्य केंद्राला (health center) कोविड सेंटर (covid center) करण्याची मागणी कर्मचारी संघटनेने केली. मात्र, विद्यापीठाचे आरोग्य केंद्र केवळ नावापुरतेच असून त्यामध्ये कुठल्याच प्रकारच्या सुविधा नसल्याने विद्यापीठातील पाच टक्केही कर्मचारी त्याचा लाभ घेत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (no facilities in health center of nagpur university)
विद्यापीठाद्वारे कर्मचाऱ्यांनी प्राथमिक सेवा मिळावी, यासाठी आरोग्य केंद्राची सुरुवात करण्यात आली. त्यामध्ये कर्मचाऱ्यांना विविध आजाराचे निदान करण्याच्या उद्देशाने औषध आणि इतर सुविधा देण्याचे ठरले होते. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून विद्यापीठाच्या दुर्लक्षित धोरणामुळे या केंद्राचे बारा वाजले आहेत. केंद्रात डोळे तपासणीची मशीन, शेक देणे, एक्सरे मशीनचा समावेश आहे. मात्र, सध्या ‘त्या’ बंद स्वरूपात आहेत. याशिवाय जे बेड आहेत, ते सात वर्ष जुने असल्याची माहिती आहे. दुसरीकडे पूर्वी मिळणाऱ्या आवश्यक औषधीही आता येथे मिळत नसल्याची माहिती आहे. त्यामुळे केंद्र नावापुरते ठरल्याचे दिसून येते. गेल्या वर्षभरापासून हे केंद्र सुरू असले; तरी त्याकडे कर्मचारी फिरकले नाहीत. त्यामुळे कोरोनाकाळातही या केंद्राचा फायदा विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना झाल्याचे दिसून येत नाही. याउलट विद्यापीठ कर्मचाऱ्यांसाठी या ठिकाणी चाचणी केंद्र आणि लसीकरण केंद्र सुरू करण्याचा प्रस्तावही येथील डॉक्टरांच्या माध्यमातून देता आला असता; मात्र त्यांनीही त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.
सेवानिवृत्त डॉक्टराचे अतिक्रमण
केंद्रात एक ज्येष्ठ डॉक्टरांची नियुक्ती केली जाते. त्यानुसार डॉ. सुरेश लाडे यांची विद्यापीठाने नियुक्ती केली होती. त्यांना विद्यापीठाकडून राहण्यासाठी क्वॉर्टर देण्यात आले होते. मात्र, सेवानिवृत्तीनंतरही डॉ. लाडे यांनी ते रिकामे केल्याचे दिसून येत नाही. याबाबत विद्यापीठाकडून सातत्याने त्यांना नोटिशी पाठविण्यात आलेल्या आहेत. मात्र, त्यांच्यावर कुठलीच कारवाई करण्यात आली नाही.
वसतिगृहात करता येणार सेंटर
विद्यापीठ कर्मचारी संघाच्या वतीने कोविड केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात केंद्रात कोविड केंद्र सुरू करण्याऐवजी विद्यापीठाने विद्यार्थी वसतिगृहाचा उपयोग करण्याची गरज आहे. त्यामुळे विद्यापीठाला कर्मचाऱ्यांसाठी केवळ दहा नव्हे; तर २० ते २५ बेडची सोय करता येणे शक्य होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.