corona 
नागपूर

मजूर मिळेना, पोलिस जाऊ देईना...आम्ही करावं तरी काय जी? 

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शेतीच्या कामाचा हंगाम सुरू झाला आहे. परंतु, संचारबंदीमुळे कामे करण्यासाठी मजूरच मिळत नसून इच्छुकांना पोलिस घराबाहेर पडून देत नसल्याचे यंदा शेतीही संकटात येण्याची शक्‍यता आहे. 

लॉकडाउनमुळे शेतकऱ्यांचा माल घरातच पडून आहे. सरकारकडून घालून देण्यात आलेल्या निर्बंधामुळे त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. पैसा नसल्याने शेती करायची कशी, असा प्रश्‍न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. गावखेड्यात कोरोनापेक्षा पोलिसांची दहशत जास्त आहे. त्यांच्या दहशतीमुळे लोक घरातून बाहेर पडण्यास तयार नाहीत. तर लॉकडाउमुळे मजूर मूळ गावाकडे परतले आहेत. उमरेड तालुक्‍यातील बेला गावातील शेतकऱ्याने सांगितले की, मजूर मिळत नसल्याचे काम रखडली आहेत. पोलिसही बाहेर जाऊ देत नाहीत. त्यामुळे पहाटेच्या सुमारासच शेतीतील कचरा, तण, पराटी काढण्यासाठी जावे लागते आणि 9 च्या आतच घराकडे यावे लागते. एका शेतकऱ्याने सांगितले की, मजूर पोलिसांच्या भीतीने येण्यास तयार नाहीत. ज्यांची शेती गावापासून दोन, चार किलोमीटरवर आहे, त्यांची मोठी अडचण होत आहे. 

मजुरांनी सात-बारा कुठून आणावा? 
शेती कामासाठी सात-बारा दाखविल्यावरच संबंधितांना जाऊ देण्यात येते. परंतु मजुरांकडे सात-बारा नाही. त्यामुळे शेतीचे काम करण्यासाठी त्यांना बाहेर पडता येत नाही. 

ठेक्‍याने शेती करणाऱ्यांची अडचण 
अनेकांकडे शेती नसून ठेक्‍याने ते इतरांची शेती करतात. त्यांच्याकडे सात-बारा नाही. अशा लोकांचीही अडचण होत आहे. ठेका घेण्यास तयार नसल्याने शेत जमीन असलेल्या गरिबांची अडचण होत आहे. 

तलाठी नाही, सात-बारा मिळणार कसा? 
लॉकडाउनमुळे तलाठी कार्यालयात नाही त्यामूळे सातबारा शेतकऱ्याना मिळणे अवघड झाले आहे. सात-बारा नसल्याने सर्व काम ठप्प झाले असून कर्जही मिळत नाही. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लालबागच्या राजाच्या चरणी केलेलं दान कुणाच्या खिशात जातंय? अभिनेत्रीने ठेवलेली ५०० ची नोट गायब होताच, नेटकऱ्यांचा सवाल

INDW vs SLW Final : 'गोल्डन गर्ल्स'! भारतीय संघाने इतिहास रचला, श्रीलंकेला नमवून जिंकले दुसरे सुवर्णपदक; स्मृती, शफाली, रिचा चमकल्या

Crime News : धुळ्याच्या विनोदचे सुरतमध्ये मोठे कांड ! १० हजारांच्या थकीत पगारासाठी मार्केटला लावली आग, १७ दुकाने भस्मसात,२४ कोटींचे नुकसान

Marathi News Live Updates : राज्यात बहुंताश ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Pune-Bengaluru Highway: लिंब फाट्याच्या उड्डाणपुलावर दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक; आनेवाडीच्या २९ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT