No matter how many expensive cars, petrol became cheaper 
नागपूर

आता कितीही दामटा गाड्या, म्हणे पेट्रोल झाले स्वस्त

सकाळ वृत्तसेवा

नागपूर :  इंधनाचे दर कमी झाल्याने सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावरील हास्य फुलले आहे. सौदी अरेबिया आणि रशियामधील कच्चा तेलाच्या भांडणात भारतीयांचे चांगभले झाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या दरात घट झाल्याने भारतीय पेट्रोलियम कंपन्यांना मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे कंपन्यांनी आज इंधन दरात कपात केली. पेट्रोल 30 पैसे तर डिझेल दर 26 पैशांनी घटवले. यामुळे नागपुरात पेट्रोल दर प्रतिलिटर 77.95 रुपये आणि डिझेल दर 64.95 रुपये झाला आहे.

जागतिक कमोडिटी बाजारात खनिज तेलाच्या घसरणीचा लाभ भारतीयांना होत आहे. खनिज तेल स्वस्त झाल्याने पेट्रोलियम कंपन्यांनी बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केली. पेट्रोलमध्ये 30 पैसे आणि डिझेलमध्ये प्रतिलिटर 26 पैशांची घट झाली. खनिज तेलाचा भाव मात्र सावरला. ब्रेंट क्रूडचा भाव 36.67 डॉलर प्रति बॅरलपर्यंत गेला. "कोरोना' विषाणूमुळे खनिज तेलाच्या मागणीवर मोठा परिणाम झाला आहे. जगभरातील तेलाची मागणी घटल्याने मागील दोन महिन्यात तेलाच्या किमती जवळपास 30 डॉलर्सने कमी झाल्या आहेत. कमॉडिटी बाजारात खनिज तेलाच्या किमतीत घट झाली होती. यामुळे खनिज तेल उत्पादक देश धास्तावले आहेत.

कोरोना विषाणूमुळे जगभरात पेट्रोल व डिझेलची मागणी कमी झालेली आहे. त्यामुळे गेल्या एक मार्चपासून सतत इंधनाच्या दरात सतत घसरण होऊ लागलेली आहे. 1 मार्चला प्रतिलिटर पेट्रोल 77.13 पैसे होते. ते आज 75.95 पैशावर आले आहे. तर डिझेल प्रतिलिटर 66 .08 पैशावरून 64 रुपये 95 पैशापर्यंत घटले आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळू लागला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Mohol drought crisis: मोहोळ तालुका दुष्काळाच्या गडद छायेत; खरीप-रब्बी हंगाम उद्ध्वस्त, चारा टंचाईने शेतकरी आर्थिक कोंडीत

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

Water Pipeline Burst: फारोळा जलशुद्धीकरण केंद्राची १२०० मिमी जलवाहिनी फुटली; छत्रपती संभाजीनगरच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम

SCROLL FOR NEXT