{"A?":"B","a":5,"d":"B","h":"www.canva.com","c":"DAERspJsD6g","i":"ZrGdgpLMmQdrSXyw0lSx8Q","b":1612779740339,"A":[{"A?":"I","A":54,"B":728.3493249291007,"D":177.65067507089944,"C":54.587207430876376,"a":{"B":{"A":{"A":"MAEQYimpthc","B":1},"B":{"A":-61.531 
नागपूर

देशाचं भविष्य असलेले खेळाडू जीव धोक्यात घालून धावताहेत रस्त्यांवर; सरावासाठी जागाच नाही

नरेंद्र चोरे

नागपूर : तालुका क्रीडा संकुल सरावासाठी मिळत नसल्यामुळे हिंगणा परिसरातील अनेक खेळाडूंना नाईलाजाने  जीव घोक्यात घालून वर्दळीच्या रस्त्यावर धावण्याचा सराव करावा लागत आहे. अशावेळी चुकून अपघात झाल्यास एखाद्या खेळाडूचा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

हिंगणा येथे शासनाचे तालुका क्रीडा संकुल आहे. दहा वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या या संकुलाचे काम निधीअभावी सध्या थंडबस्त्यात आहे. त्यामुळे रनिंग ट्रॅकही पूर्ण होऊ शकला नाही. परिणामतः परिसरातील धावपटूंना नियमित प्रॅक्टिससाठी इकडेतिकडे भटकंती करावी लागत आहे. उल्लेखनीय म्हणजे, संकुलाच्या बाजूलाच कोरोनाचे सेंटर सुरू करण्यात आले आहे. त्यामुळेदेखील त्यांच्या सरावात व्यत्यय येत आहे. नुकत्याच शाळा सुरू झाल्या असून, हळूहळू स्पर्धाही होऊ लागल्या आहेत. त्यामुळे आता सर्वच खेळाडू जोमाने सरावाला भिडले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, हिंगणा परिसरातील काही क्लबची मुले-मुली सध्या वर्दळीच्या रस्त्यावर सकाळ-संध्याकाळ प्रॅक्टिस करीत आहेत. या मार्गावर वाहनांची सारखी गर्दी राहाते. अशावेळी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सरावासाठी जवळपास चांगली जागा उपलब्ध नसल्यामुळे  नाईलाजाने आम्हाला हा पर्याय निवडावा लागला असल्याचे एका क्लबच्या प्रशिक्षकाने सांगितले. 

सराव मार्गावर खेळाडूंची विशेषतः लहान मुलांची योग्य ती काळजी घेण्यात येत असल्याचेही ते यावेळी म्हणाले. शासनाने खेळाडूंना सरावासाठी लवकरात लवकर तालुका क्रीडा संकुल उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी या निमित्ताने जोर धरू लागली आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सामान्यांना दिलासा! पेट्रोल पंपावरून मिळणार रॉकेल; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या नवीन योजना आणि किंमत...

BCCI जसप्रीत बुमराहला २ कोटींची नुकसान भरपाई देणार; त्यांच्या एका निर्णयाने झालाय घोळ, करायला गेले एक अन् घडलं भलतंच...

Latest Marathi News Live Update : बालेवाडीत ढगांची गर्दी; रिमझिम पावसाची सुरुवात

Yeola Traffic Rule : येवलेकरांना मोठा दिलासा! २४ मार्चपासून मनमाड-मालेगाव मार्गावर दिवसा अवजड वाहतुकीला बंदी

राहुल मोदीशी लग्न करणार श्रद्धा कपूर? मावशी तेजस्विनी कोल्हापुरेने दिली पहिली प्रतिक्रिया, हसल्या आणि म्हणाल्या-

SCROLL FOR NEXT