no ravan dahan this year in nagpur  
नागपूर

यंदा रावणाला फटाके नाहीच; कोरोनामुळे ६८ वर्षाची रावण दहनाची परंपरा होणार खंडीत

मंगेश गोमासे

नागपूर: कोरोनाच्या प्रादुर्भावाने यावर्षी दीक्षाभूमीवरील कार्यक्रम रद्द करण्यात आल्यावर गेल्या ६८ वर्षांची परंपरा असलेल्या सनातन धर्म युवा सभेतर्फे कस्तूरचंद पार्क येथे घेण्यात येणारा रावण दहणाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

सनातन धर्म युवा सभेतर्फे नागपुरात गेल्या ६८ वर्षांपासून विजया दशमीच्या निमित्ताने कस्तूरचंद पार्क मैदानावर रावण दहण कार्यक्रमाचा भव्य कार्यक्रम आयोजन करण्यात येते. यामुळे नागपूर शहराच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये वेगळी ओळख निर्माण झाली आहे. यावेळी नागपूर आणि जवळपास ग्रामीण भागातील दीड लाख लोक हा मेगा इव्हेंट पाहण्यासाठी एकत्र येतात. 

कार्यक्रमात रामायण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांचे पुतळे जाळण्यापूर्वी रामायणातील एका मालिकेतली छोटेसी नाटिका प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करते. तसेच रंगीबेरंगी फटका शो व विविध प्रकारचे लोकनृत्याचे सादरीकरण हे विशेष आकर्षण ठरत असते.

मात्र, यावर्षी कोरोनामुळे देशभरातील सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहे. यातूनच यावर्षी कस्तूरचंद पार्क मैदानावरील रावण दहनचा कार्यक्रम सनातन धर्म युवा सभेतर्फे रद्द केला असल्याचे सनातन धर्म युवा सभेचे सरचिटणीस संजीव कपूर यांनी कळविले आहे.

प्रतिकात्मक रावण दहण करणार

ही सांस्कृतिक परंपरा अविरत सुरू ठेवण्यासाठी यावर्षी ६८ व्या रावण दहन कडबी चौकातील सनातन धर्म युवा सभेच्या प्रांगणात प्रतिकात्मक पद्धतीने आयोजित करण्यात येणार आहे. ज्यामध्ये पारंपारिक मार्गाने अवघ्या १५ फूट अंतरावर रावणाचा पुतळा दहन करण्यात येईल. 

यावेळी कोविड -१९ चे लागू असलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत हा कार्यक्रम केवळ मर्यादित सदस्यांच्या उपस्थितीत घेण्याचे ठरले असल्याचे संस्थेतर्फे कळविण्यात आले आहे.


संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

Anurag Thakur : जेव्हा देशाला गरज असते तेव्हा गांधी दांड्या मारतात; अनुराग ठाकूर यांची टीका

Beed Crime: बीडच्या परळीमध्ये धक्कादायक घटना! पोट फाडून पत्नीचा खून; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT