no school programs and no trips this year due to corona  
नागपूर

ना सहलीची मज्जा, ना गॅदरिंगची धमाल; कोरोनामुळे यंदा बच्चेकंपनीच्या आनंदावर विराजण 

रवींद्र कुंभारे

गुमगाव (जि. नागपूर):  दरवर्षी डिसेंबर महिना म्हटले की शाळा-महाविद्यालयांमधून शैक्षणिक सहलीसह वार्षिक स्नेहसंमेलनाची  धामधूम असते. परंतू यंदा कोरोना विषाणू संसर्गजन्य परिस्थितीने निर्बंध आले आहेत. सध्या नागपूर शहरासह जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागातील शाळा १३ डिसेंबरपर्यंत बच्चेकंपनीसाठी 'लॉक'च असल्याने चिमुकल्यांना यंदा सहलीची मज्जा आणि गॅदरिंगचा आनंद लुटता येणार नाही. बच्चेकंपनी मात्र दरवर्षी शाळेत होणाऱ्या सहलीतील 'मज्जा' आणि गॅदरिंगमधील 'धम्माल' मिस करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. 

दिवाळीनंतर शाळा सुरू झाल्यावर डिसेंबर महिन्यात शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहल आणि वार्षिक स्नेहसंमेलांची चाहूल लागते. सहलीमुळे चिमुकल्यांचा उत्साह ओसंडून वाहत असतो. अनोळखी गावाचा प्रवास करताना विद्यार्थी वेगळ्याच विश्वात रममाण होतात. यातून विविध ऐतिहासिक व निसर्गरम्य ठिकाणांचा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव दिला जातो. 

सहलीसोबतच वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांना विविध कलागुण सादर करण्याची मोठी संधी असते. परंतु यंदा मार्च महिन्यापासून शैक्षणिक नियोजन विस्कळीत झाले असल्याने सहल आणि वार्षिक स्नेहसंमेलनाच्या आनंदावर विरजण पडले आहे. गेल्या सात महिन्यांपासून घरीच बसून कंटाळलेली बच्चेकंपनी शाळेचे विश्व प्रत्यक्ष अनुभवता येत नसल्याने हिरमुसली आहेत. सहल, गॅदरिंग, प्रार्थना, शालेय परिपाठ या सगळ्या गोष्टींना 'मिस' करत असल्याचे दिसून येत आहे. 

दिवाळीत थोडीफार उसंत 

यंदा कोरोनाच्या धास्तीतच शैक्षणिक अर्धे सत्र संपले. घरी बसून कंटाळा आलेली मुले कोरोनामुळे सात महिन्यांपासून कुठे पाहुणे म्हणून गेलेली नाहीत. आजोळ, मामाचे गाव अशी उन्हाळा सुट्टीत मजा करण्यासाठी ठरलेली गावे कोरोनामुळे बच्चेकंपनीला या गावांना जाता आलेले नाही. दिवाळी आणि भाऊबीजेला आई वडिलांसोबत थोडेफार बाहेर जायला मिळाले. तीच थोडीफार उसंत. परंतू गेल्या सात महिन्यांपासून गंमतजंमत नावाचा प्रकारच त्यांना अनुभवता येत नसल्याने बच्चेकंपनी हिरमुसली असल्याचे दिसून येते.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT