Now gipsy for 6 people available in Forest in Nagpur  
नागपूर

पर्यटकांनो खुशखबर! आता संपूर्ण कुटुंबासोबत लुटा जंगल सफारीचा आनंद; जिल्ह्याधिकाऱ्यांचा महत्वाचा निर्णय  

राजेश रामपूरकर

नागपूर ः पेंच, बोर व्याघ्र प्रकल्प, उमरेड-कऱ्हाडला-पवनी अभयारण्यात एका जिप्सीत सहा पर्यटकांना तसेच २४ सिटर कॅंटर बसमध्ये २० आणि १८ सिटर कॅंटरमध्ये १५ पर्यटकांना जंगल भ्रमंतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली. केंद्र आणि राज्य शासनाने दिलेल्या कोविड १९ बाबत घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे, असेही आदेशात म्हटले आहे. 

आंतरराष्ट्रीयस्तरावर देशांतर्गत कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव व प्रसारात वाढ होऊ नये तसेच कोरोना विषाणूंमुळे होणाऱ्या आजाराबाबत दक्षता घेण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवल्या जात होत्या. देशात आणि राज्यामध्ये टाळेबंदीचे निर्बंध शिथिल करण्यात आलेले आहेत. 

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने पाच जून २०२० ला काही बंधनाचे पालन करून व्याघ्र प्रकल्पात निसर्गपर्यटन सुरू करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पेंच, बोर व्याघ्र प्रकल्प आणि उमरेड-कऱ्हांडला- पवनी अभयारण्यात निसर्गपर्यटनासाठ अटी टाकण्यात आल्या होत्या. त्यात जिप्सी, कॅंटर बसमध्ये वाहन क्षमतेपेक्षा ५० टक्के एवढेच पर्यटकांना वाहनात प्रवेश देण्यात येत होते. 

आता जिल्ह्यातील कोविड बाधित रुग्णांची संख्या कमी होत असून साथ नियंत्रणाखाली आली आहे. त्यामुळे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी (वन्यजीव पूर्व) यांनी वन भ्रमंतीस पर्यटक वाहन क्षमता पूर्ववत करण्याची परवानगी देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा करण्यात येत होता. याबाबतचे वृत्त ‘सकाळ'ने २६ जानेवारी रोजी प्रकाशित केले होते. त्याची दखल जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शुक्रवारी जिप्सीमध्ये सहा पर्यटकांना भ्रमंतीची परवानगी दिली आहे. त्यामुळे पर्यटकांना दिलासा मिळाला असून उद्यापासून या प्रकल्पात पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांना आपल्या परिवारातील दोन सदस्यांना जिप्सीत जंगल भ्रमंतीसाठी घेऊन जाता येणार आहे. 

हे आहेत पर्यटनासाठीचे नियम

  • पर्यटनस्थळी येणाऱ्या सर्व पर्यटक, वाहन चालक तसेच गाइडचे थर्मामीटर गनद्वारे स्पर्श न करता तापमान मोजण्यात यावे.
  • साधारण तापमानापेक्षा जास्त तापमान आढळल्यास अशा व्यक्तींना त्वरित नजीकच्या विलगीकरण केंद्रात दाखल करणे. 
  • सर्व पर्यटक गाइड व वाहन चालकांना मास्क, फेसशिल्डचा वापर करावा. वाहनात सॅनिटायझर ठेवावे. 
  • पर्यटनासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनाची चाके प्रत्येक फेरीनंतर निर्जंतुकीकरण करावे. 
  • आरोग्यसेतू ॲपचा वापर करणे बंधनकारक.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs UAE: what a throw! पाकिस्तानी खेळाडूने अम्पायरला चेंडू फेकून मारला, वसीम अक्रमने केलं कौतुक! सोशल मीडियावर ट्रोल

Kharadi Traffic : खराडी-हडपसर रस्त्यावर बेशिस्त पार्किंग, वाहतूक कोंडी व अपघाताची शक्यता; नागरिकांची कारवाईची मागणी

Handshake Controversy Timeline : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची टप्प्याटप्प्याने कशी नाचक्की होत गेली ते वाचा... Andy Pycroft प्रकरण त्यांच्यावरच कसं उलटलं?

Latest Maharashtra News Updates : लासलगावमध्ये एकतर्फी प्रेमाच्या संशयातून तरुणावर कोयत्याने हल्ला...

Family Travel Tips: फॅमिलीसोबत प्रवासात निघालात? डिहायड्रेशनपासून बचावासाठी ही फळं सोबत ठेवा!

SCROLL FOR NEXT