shutter lock 
नागपूर

आणखी 20 दिवस घरीच बसा, नियम होणार अधिक कठोर

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : तीन दिवसानंतर लॉकडाऊन संपल्यानंतर घराबाहेर पडण्याचे बेत आखलेल्यांची निराशा झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनमध्ये वाढ केल्याने आणखी 20 दिवस नागरिकांना घरातच बसावे लागणार आहे. त्यामुळे सुमारे 50 दिवस घरातच राहण्याचा अनोखा विक्रमही होणार आहे.
लॉक डाऊनमुळे घरात बंदिस्त झालेले नागरिक कंटाळले आहेत. रोज काय करावे हेच अनेकांना सुचेनासे झाले आहे. टीव्ही बघून किती वेळ टाईमपास करायचा असाही प्रश्‍न अनेकांना पडला आहे. मॉर्निंग वॉकलाही निघता येत नसल्याने अनेकजण अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे केव्हा एकदाचा लॉकडाऊन संपतो याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. लॉकडाऊनचे अवघे तीन दिवस शिल्लक असल्याने अनेकांना हायसे वाटत होते. मात्र उलट घडले. सर्वप्रथम लॉकडाऊन जाहीर केलेल्या महाराष्ट्राने पुन्हा एकदा कालावधी वाढवला आहे. तो तब्बल 20 दिवसांचा आहे. यानंतरही परिस्थिती सुधारली नाही तर आणखी वाढ केली जाईल असे सुतोवाचही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.        यात मोलमजुरी करणारे, रोजच रोजगाराच्या शोधात असलेले भरडले जाणार आहे.
कोरोना संशयितांची वाढती संख्या बघून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 16 मार्चला सर्वप्रथम महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर केले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 डिसेंबरपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यानंतर लॉकडाऊनमधून सुटका होईल अशीच सर्वांची अपेक्षा होती. मात्र मुंबई, पुण्यासह इतर शहरांमध्येही कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे.  

  देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. रुग्णांच्या संपर्कात आलेले काहीजण अद्यापही मोकळे फिरत आहेत. त्यामुळे काही वस्त्यांना जाणीवपूर्वक सिल करण्यात आले आहे. दिवसेंदिवस कोरोना संशयितांच्या संख्येतही वाढ होत चालली आहे. त्यामुळे यापुढे लॉकडाऊन आणखीच कडक राहणार असल्याचे संकेतही सरकारतर्फे देण्यात आले आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

"कोण हिंदू? कोण मुस्लिम?" धर्माच्या भिंती ओलांडून 'बाप्पा' पाकिस्तानात! मूर्ती घडवतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल; Viral Video

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT