now maratha student will get shahu maharaj scholarship  
नागपूर

खुशखबर! खुल्या प्रवर्गातून प्रवेश घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांना आता शाहू महाराज शिष्यवृत्तीचा लाभ; शासनाचा निर्णय 

निलेश डोये

नागपूर : मराठा आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. विद्यार्थांच्या प्रवेशाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. सरकारने खुल्या प्रवर्गातून प्रवेश घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती व डॉ. पंजाबराव वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे आर्थिक दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) करिता राखिव जागांमधून प्रवेश घेणाऱ्यांनाही या दोन्ही योजनांचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठा वर्गाच्या आरक्षणाचा विषय अनेक वर्ष जुना आहे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात मराठा आरक्षण प्रथम देण्यात आले. न्यायालयाकडून ते अवैध ठरविण्यात आले. त्यानंतर सत्तेवर आलेल्या फडणवीस सरकारने मागासवर्गाच्या अहवालाच्या आधारे मराठा वर्गाला शिक्षणात १२ तर नोकरीत १३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. 

राज्यात सत्ताबदल झाले. सर्वोच्‍च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली. त्यामुळे नोकर भरती आणि शिक्षणातील आरक्षणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला. सरकारने मराठा वर्गाला खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. दरम्यानच्या काळात मराठाचे प्रमाणपत्र देण्याचे आदेश शासनाने प्रशासनाला दिले. 

आता सरकारने खुल्या प्रवर्गातून प्रवेश करून अटी शर्तीची पुरता करणाऱ्यांना मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती व डॉ. पंजाबराव वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगितीच्या कालावधीत आर्थिक दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) करता राखिव असलेल्या जागांमधून प्रवेश घेणाऱ्यांनाही दोन्ही योजनांचा लाभ देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना : आठ लाख रुपये वार्षिक उत्पन्‍न असलेल्यांना ५० टक्के शिक्षण शुल्क व ५० टक्के परीक्षा शुल्क शिष्यवृत्तीच्या माध्यामातून देण्यात येते. डॉ. पंजाबराव वसतिगृह निर्वाह भत्ता योजना : मनपा क्षेत्रात ३० हजार तर ग्रामीण भागाकरता २० हजार रुपये प्रतिवर्ष निर्वाह भत्ता देण्यात येते.

संपादन - अथर्व महांकाळ 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: मी माफी मागतो...! इंग्लंडच्या स्टार फलंदाजाची आयत्यावेळी माघार, हॅरी ब्रूकनंतर त्याच्यावरही होणार बंदीची कारवाई

Pune News : ‘पीटीपी’ अ‍ॅपमुळे वाहतूक शिस्तीत सुधारणा; अडीच लाख तक्रारींवर ९.३२ कोटींचा दंड

‘कुकडू कू’चा गोंधळ रंगला! ‘सुपर डुपर’चं धमाल गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Chakan News : तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाला मंत्रिमंडळाची मंजुरी; ४२०७ कोटींचा प्रकल्प मार्गी

IPL 2026 Marathi News: चेन्नई सुपर किंग्सच्या गळाला मोठा मासा; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने पाकिस्तान सुपर लीगला मारली 'लाथ'

SCROLL FOR NEXT