Now the railway line of two hundred and sixty meters in a row 
नागपूर

आता सलग २६० मीटरचे रेल्वेरूळ; जुनी संकल्पना संपुष्टात

योगेश बरवड

नागपूर : आजवर १३ मीटर लांबीचे रूळ जोडून रेल्वेमार्ग तयार केला जायचे. पण, जेवढे जॉईंट तेवढाच धोका अधिक वाढतो. यामुळे जुनी संकल्पना आता हद्दपार झाली असून, सलग २६० मीटरचे रूळ तयार केले जात आहेत. ही नवी संकल्पना भारतीय रेल्वेची आधुनिक क्रांतीच मानली जात आहे.

भीलाई स्टील प्लांट येथे प्रत्येकी १३ मीटर लांबीचे रूळ तयार केले जातात. ते स्लिपरला जोडून रूळ तयार केला जात होता. लांबीने कमी असलेल्या या रुळांना ठिकठिकाणी जोड द्यावा लागतो. पण, रेल्वे वाहतुकीच्या दृष्टीने हे जोड धोक्याचे ठरण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेता अधिक लांबीचे रूळ तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील वरोऱ्यात रेल्वेने नवा प्रकल्प सुरू केला असून तिथे छोट्या रुळांना जोडून २६० मीटरचा सलग रूळ तयार करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत शंभर किमीचे रूळ तयार करण्यात आले आहेत. सुरक्षित रेल्वेसाठी हा प्रकल्प वरदान ठरणार आहे.

वाहतुकीच्या घनतेवर लोहमार्गाची क्षमता निश्चित केली जाते. रुळांच्या आयुष्याची साधारण क्षमता ८०० ग्रॉस मेट्रिक टन (जीएमटी) म्हणजे सरासरी १० ते १२ वर्षांचे आयुष्य असते. दरवर्षी साधारणपणे ६० ते ७० किमी रूळ बदलवण्यात येतात. पण, यंदा ऑक्टोबरपर्यंत ११० किमी रूळ बदलवण्यात आले आहेत.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गेल्यावेळी मुंबईत धिंगणा घातलात, घाण केलीत; लोकांचे सण खराब केले, हिंदुस्थानी भाऊची जरांगेंवर वादग्रस्त शब्दात टीका

Short Circuit Suspected Behind Fire : आनंदाच्या वातावरणाला आगीचे ग्रहण : शॉर्टसर्किटमुळे घराला आग; दोन मुलींसह आई आणि चुलतीचा मृत्यू

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या डिफेंडर गाडीची पोलिसांकडून कसून तपासणी; तपासणी करण्यामागचे कारण काय?

'लाल लाल कलरची बांगडी...'नऊवारी साडी अन् मराठमोळा लूक, शिल्पा शेट्टीचा डान्स पाहिलात का? Viral Video

QR स्कॅन करण्यापासून ते खात्यात पैसे जमा होण्यापर्यंत, UPI नेमकं कसं काम करतं? वाचा पडद्यामागची संपूर्ण कहाणी

SCROLL FOR NEXT