नागपूर

रुग्णांची लूट थांबणार! हॉटेल, शाळेतील कोविड केअर सेंटरला दरपत्रक लावणं बंधनकारक

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : हॉटेल, शैक्षणिक संस्था, लॉनमध्ये कोविड केअर सेंटर (Covid Care Center) सुरू करणाऱ्यांना दरपत्रक लावण्याचे लावण्याचे निर्देश आयुक्त राधाकृष्णन बी. (Radhakrishnan B.) यांनी दिले. रुग्णांकडून मर्जीप्रमाणे वसुली करणाऱ्या कोविड केअर सेंटरवर आता वचक बसणार असून रुग्णांना दिलासा मिळणार आहे. (Now Rate card is compulsory for Covid care centers in hotels and schools)

बाधित रुग्णांवर उपचाराच्या आड शहरात अनेकांनी हॉटेल, शैक्षणिक संस्था, लॉन, मंगल कार्यालयात कोविड केअर सेंटरच्या नावाने गोरखधंदा सुरू केला असून लाखोंच्या घरात लूट सुरू आहे. याकडे लक्ष वेधत 'सकाळ'ने काल, शुक्रवारी 'कोविडालय, केअर सेंटरच्या नावाने गोरखधंदा' या मथळ्यासह ठळकपणे वृत्त प्रकाशित केले होते.

या वृत्ताची दखल घेत आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी काल, शुक्रवारी हॉटेल, मंगल कार्यालय, लॉन, शैक्षणिक संस्थेत कोविड केअर सेंटर सुरू करून बाधितांची लूट करणाऱ्यांवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या कोविड केअर सेंटरमध्ये केवळ लक्षणे नसलेले तसेच गंभीर नसलेल्या रुग्णांनाच दाखल करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. याशिवाय या सेंटरवर २४ तास डॉक्टर, नर्सची सेवा, औषधी उपलब्ध करून देण्यासोबतच जैविक कचऱ्याची विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीने लावण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या आहेत.

केवळ चार हजार घेण्याच्या सूचना

हॉटेल्स, लॉन, मंगल कार्यालय, शाळेत तयार करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल रुग्णांकडून केवळ चार हजार रुपये घेण्याचे आयुक्तांनी बंधनकारक केले आहे. यात रुग्णाची देखरेख, ऑक्सिजनचा पुरवठा, बेड शुल्क, जेवण, नर्सिंग शुल्काचा समावेश आहे. यासंबधी दरपत्रक अग्रभागात लावण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.

(Now Rate card is compulsory for Covid care centers in hotels and schools)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : पाचव्या टप्प्यात मुंबई बनणार ‘रणभूमी’; पंतप्रधानांचा रोड शो आणि सभांचे नियोजन

Water Storage : राज्यात केवळ २५ टक्के पाणीसाठा

Illegal Hoarding : संकटांचे सापळे! अनधिकृत होर्डिंगवरील कारवाईचे कागदी घोडे

Pune Loksabha Election : कोथरूड, वडगावशेरी ठरविणार पुण्याचा खासदार

अग्रलेख : कोसळणारे भ्रष्ट मनोरे...

SCROLL FOR NEXT