number of corona patients are near to 9000 in Nagpur
number of corona patients are near to 9000 in Nagpur  
नागपूर

Corona Update: नागपुरात कोरोनाबळींचे त्रिशतक; बाधितांची संख्या नऊ हजारांच्या उंबरठ्यावर.. जाणून घ्या आजची आकडेवारी

राजेश प्रायकर

नागपूर: उपराजधानीत कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात होत असून आज जिल्ह्यात २३ जणांचा मृत्यू झाला. या मृत्यूसह जिल्ह्यात कोरोनाबळींच्या संख्येने त्रिशतक पार केले. २३ मृत्यूमध्ये शहरातील १७ जणांचा समावेश असून ग्रामीण भागात ६ मृत्यूची नोंदी करण्यात आली. नवीन ३७४ जणांना कोरोनाचे निदान झाले असून बाधितांची संख्या ऩऊ हजारांच्या उंरबठ्यावर पोहोचली आहे.

कोरोनाबाधित आणि दररोज वाढणाऱ्या मृतांच्या संख्येने कोरोनावर नियंत्रणाचे सारेच उपाय संपुष्टात आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात २३ कोरोनाबाधितांचा मृत्यू ओढवल्याने दगावणाऱ्यांची संख्या आता ३१५ पर्यंत गेली आहे. तर आज आणखी ३७४ रुग्णांची भर पडल्याने बाधितांची संख्या ८७८० पर्यंत धडकली. कोरोनाची बाधा झाल्यानंतर उपचारादरम्यान रविवारी दगावलेल्यांपैकी ३ जण हे जिल्ह्याबाहेरील आहेत. 

कोरोनाची लक्षणे आढळल्यानंतर जिल्ह्यात २३२५ जणांच्या घशातील स्त्राव नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. त्यापैकी कोरोनाची नव्याने बाधा झालेल्यांमध्ये ३२४ जण शहरातील असून उर्वरित ५० जण ग्रामीण भागातून पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यात सध्याच्या स्थितीत २२४० सक्रिय रुग्ण उपचार घेत असून यात शहरातील १६७७ तर ग्रामीण भागातील ५६३ जणांचा समावेश आहे. 

कोणत्या झोनमध्ये किती रुग्णांची नोंद 

रविवारी कोरोनाचे निदान झालेल्यांपैकी अँटिजन रॅपिड टेस्टमधून सर्वाधिक २५१ नमुन्यांचा अहवाल पॉजिटिव्ह आला. याशिवाय मेडिकलच्या प्रयोगशाळेतून ६०, खासगीतून ४५ तर एम्समधून १४ जणांच्या घशातील स्त्राव नमुन्यांमध्ये करोना विषाणूचा अंश आढळला. रविवारी निदान झालेल्या कोरोनाबाधितांपैकी आशीनगर झोनमधील ५४ रहिवासी तर लक्ष्मीनगर झोनमधील ४७, हनुमाननगर झोनधील २४ तर गांधीबाग झोनमधील २३ जणांचा समावेश आहे. 

मेयोत मृत्यू झालेल्यांमध्ये क्वेटा कॉलनीतील ५० वर्षीय नागरिकाचा समावेश आहे. याशिवाय नारी येथील म्हाडा कॉलनीतील ४२ वर्षीय महिला, टेका नाका हमीदनगर येथील ५६ वर्षीय महिला, गोरेवाडा संगमनगरातील ७० वर्षीय पुरुष, लकडगंज पोलिस स्टेशनमधील ५४ वर्षीय पुरुष, सुगतनगरातील ७२ वर्षीय महिला, जीआरसी कामठी येथील ७५ वर्षीय पुरुष, टिमकीतील ५८ वर्षीय महिला, यशोधरानगरातील ७२ वर्षीय पुरुष, वाडीतील विकासनगरातील ८० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. 

मेडिकलमध्ये रविवारी उपचारादरम्यान ५ कोव्हिड ग्रस्त दगावले. यात जयभीम नगरातील त्रिशरण चौकातील ६३, उमरेडच्या अशोकनगरातील ५१, सुभाषनगरातील ६४ वर्षीय पुरुषांचा तर टिमकीतील ९० आणि जयताळातील ६० वर्षीय महिलांचा समावेश आहे.

१४६ जण कोरोनामुक्त

रविवारी १४६ बाधित आजारमुक्त होऊन घरी परतले. चिंताजनक बाब म्हणजे करोनामुक्तीचा टक्का पुन्हा दिड टक्क्यांनी घसरत ५३. ४३ वर गडगडला आहे. आजपर्यंत ४६९२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

नऊ दिवसांत पावणेदोनशे मृत्यू

जिल्ह्यातील एकूण मृत्यूपैकी १७७ मृत्यू गेल्या नऊ दिवसांत नोंदविण्यात आले. नागपुरात पहिल्या कोरोनाबाधिताच्या मृत्यूची नोंद एप्रिलमध्ये झाली होती. जुलैपर्यंत, अर्थात चार महिन्यांत १३८ मृत्यूची नोंद झाली होती.

जिल्ह्याची स्थिती

दैनिक संशयित -  ४३६
एकूण संशयित -  २६७७२
रविवारचे पॉझिटिव्ह -  ३७४
आतापर्यंत पॉझिटिव्ह -  ८७८०
रविवारचे करोनामुक्त - १४६
आतापर्यंत करोनामुक्त - ४६९२

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Mumbai Lok Sabha: उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Healthy Menopause: हेल्दी मोनोपॉझसाठी 'या' नैसर्गिक उपायांचा करा वापर, मिळतील अनेक फायदे

Rishi Kapoor: 'ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ते आपल्याला सोडून जात नाहीत'; ऋषी कपूर यांच्या आठवणीत लेक अन् पत्नी भावूक

SCROLL FOR NEXT