The number of corona patients in Nagpur is three hundred 
नागपूर

या शहरात कोरोनाचे त्रिशतक पूर्ण

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : उपराजधानी कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, मंगळवारी दुपारी आणखी दोन संशयित रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नागपुरातील कोरोनाग्रस्तांचा आडका तिनशेवर पोहोचला. मंगळवारी सतरंजीपुरा येथील 42 वर्षीय तर मोमिनपुरा येथील 52 वर्षीय पुरुषाचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नागपुरात रुग्णसंख्या तिनशेवर पोहोचली.

मेडिकलच्या कोविड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती असलेला पांढराबोडी येथील 29 वर्षीय कोरोनाबाधित युवकाचा सोमवारी मृत्यू झाला. कोरोनाच्या विषाणूमुळे नागपुरात झालेला हा चौथा मृत्यू आहे. उपराजधानीत कोरोनाच्या बाधेमुळे सतरंजीपुरा येथील पहिला मृत्यू झाला होता. यानंतर तब्बल 25 दिवसांनंतर मोमिनपुरा येथील वृद्ध दगावला होता. तर यानंतर रामेश्‍वरी येथील फूटबॉलचा खेळाडू असलेला 22 वर्षीय युवक कोरोनामुळे दगावला होता.

सोमवारी (ता.11) शहरात चौथ्या मृत्यूची नोंद झाली. शहरात झालेल्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या मृत्यूंमध्ये पाच-पाच दिवसांचे अंतर आहे हे विशेष. शहरातील चौथा मृत व्यक्‍ती पांढराबोडीतील रहिवासी आहे. 6 मे रोजी मेडिकलमध्ये झालेल्या तपासणीतून हा युवक कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. तत्काळ त्याच्यावर मेडिकलच्या कोविड वॉर्डात उपचार सुरू झाले.

मात्र, पांढराबोडीतील या युवकाला यकृताचा आजार होता. याशिवाय रक्तक्षय असून क्षयाचाही रुग्ण असल्याने त्याची रोगप्रतिकारशक्ती अतिशय खालावली होती. श्‍वास घेताना त्याला धाप लागत असे. 6 मे रोजी कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू झाले. संपर्कातून या व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली होती. शहरातील चारही मृत्यू सामुदाय प्रादुर्भावाचे बळी ठरले असे म्हणता येईल.

मृत कोरोनाबाधिताच्या पार्थिवावर मोजक्‍या नातेवाइकांच्या उपस्थितीत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रात्री अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार केले. धरमपेठ झोनचे झोनल आरोग्य अधिकारी दीनदयाल टेंभेकर यांच्या मार्गदर्शनात कोरोनाबाधित मृतदेहाच्या विल्हेवाटीसंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.


कोरोनामुक्त झालेल्यांची शतकी वाटचाल


शहरात बाधितांची संख्या तिनशे झाली असली तरी कोरोनावर मात करणाऱ्यांचे शतक पूर्ण होत आहे. सोमवारी चार जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनामुक्तांचा आकडा 96 वर पोहोचला. सोमवारी मेडिकलमधील एक आणि मेयोतील तीन अशा चौघांना कोरोनामुक्त झाल्याचे घोषित करण्यात आले. त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PCMC Election: बंडखोरी टाळण्यासाठीचा डाव भाजपवरच कसा उलटला? पिंपरी चिंचवडमध्ये नेमकं काय घडलं? ‘राष्ट्रवादीं’ची आघाडी यशस्वी?

माेठी बातमी! बॉम्बस्फोट प्रकरणातील बंटी जहागीरदारची हत्या; सात राउंड फायर, मित्र जखमी, आरोपी सीसीटीव्हीत कैद!

Plane Service : दिल्लीतील धुक्याचा विमानसेवेला फटका; पुण्याला येणारी तीन उड्डाणे रद्द; प्रवाशांची गैरसोय

8th Pay Commission : आठवा वेतन आजपासून लागू,सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार? जाणून घ्या

सनी देओलच्या प्रेमात वेडी होती एका सुपरस्टारची सासू, दुसऱ्याशी लग्न केल पण, इकडे सनीसोबत गुपचूप प्रेमसंबंध चालूच!

SCROLL FOR NEXT