नागपूर : कोरोनाचा विळखा वाढत असून प्रशासन, आरोग्य यंत्रणेची लाचारी आता स्पष्ट दिसू लागली आहे. कोरोनामुळे २४ मृत्यू झाले असून एकूण बळीसंख्या पाचशेवर पोहोचली आहे. बळींची संख्या वाढत असतानाच कोरोनाबाधितांचा आलेखही उंचावत आहे. शहरातील विविध लॅबमधून आलेल्या तपासणी अहवालातून जिल्ह्यातील ६२३ जणांना कोरोनाचे निदान झाले. यात ५३८ शहरातील असून ८५ ग्रामीण भागातील बाधितांचा समावेश आहे. सातत्याने वाढती मृत्यू व बाधितांच्या संख्येमुळे कोरोनावर नियंत्रणासाठीचे सारेच प्रयत्न अपयशी तर आरोग्य विभागाच्या बैठकी वांझोट्या ठरत असल्याचे दिसून येत आहे.
शहरात कोरोनाबाधित तसेच मृत्यूच्या संख्येने नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे. वाढत्या कोरोनाबाधितांमुळे शहरातील सर्वच शासकीय हॉस्पिटलमध्ये खाटांचाही अभाव दिसून येत आहे. कोरोनामुळे वैद्यकीय आणीबाणीची स्थिती निर्माण झाली असून आज आढळून आलेल्या ६२३ जणांमुळे कोरोनाबाधितांची संख्या १४ हजार ६१३ पर्यंत पोहोचली. यात शहरातील १० हजार ७१० तर ग्रामीण भागातील ३९०३ जणांचा समावेश आहे. नव्याने विषाणूची बाधा झालेल्यांमध्ये सर्वाधिक ३१६ जणांचा अहवाल अँटिजन रॅपिड टेस्टमधून पॉझिटिव्ह आला. तर मेयोतून ९८, खासगीतून ८९, मेडिकलमधून ७२, एम्समधून ४४ आणि निरीच्या लॅबमधून ४ जणांच्या घशातील स्राव नमुन्यांमध्ये कोरोनाचा अंश आढळला.
जिल्ह्यात आज दिवसभरात २५६२ जणांच्या घशातील स्त्राव नमुना तपासला गेला. आज झालेल्या २४ मृत्यूंमध्ये शहरातील २२ तर नागपूर ग्रामीण व जिल्ह्याबाहेरील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. आज मेडिकलमध्ये झालेल्या मृत्यूमध्ये खापरखेडा येथील २० वर्षीय तरुण, शांतीनगरातील ६८ वर्षीय वृद्ध, संत्रा मार्केट येथील ४५ वर्षीय व्यक्ती, साई मंदिर परिसरातील ५६ वर्षीय महिला, हिंगणा रोडवरील ५२ वर्षीय व्यक्ती, भरतनगर येथील ५८ वर्षीय व्यक्ती, कळमना येथील ६० वर्षीय महिला, इतवारीतील ७३ वर्षीय वृद्ध, हजारीपहाड येथील ४४ वर्षीय तरुण, गांजाखेत चौकातील ७४ वर्षीय वृद्ध महिला, बाबुळबन येथील ६० वर्षीय वृद्ध, वाडीतील ३४ वर्षीय तरुण, पार्वतीनगरातील ६४ वर्षीय वृद्ध, बगडगंज येथील ७० वर्षीय वृद्ध महिलेसह मध्यप्रदेश व शहरातील काही भागातील नागरिकांचा समावेश आहे.
मेयोत मृत्यू पावलेल्या कोरोनाबाधितांमध्ये महाल येथील ४३ वर्षीय तरुण, जरीपटका येथील ७२ वर्षीय महिला, खलासी लाइन मोहनगरातील ७७ वर्षीय वृद्ध, प्रेमनगरातील ७५ वर्षीय महिला, मानेवाडा दौलतनगरातील ६८ वर्षीय वृद्ध, मोमीनपुऱ्यातील ३२ वर्षीय तरुणी, बजेरियातील ६० वर्षीय महिलेचा समावेश आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव झालेले जिल्ह्यातील ७१८६ सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांपैकी ५६२१ एकट्या शहरात असून १५६५ बाधित ग्रामीण मधील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. यातील २७१४ जणांना सौम्य लक्षणे असल्याने घरीच उपचार देण्यात येत आहे.
या घटनाक्रमात समाधानाची एकमेव बाब म्हणजे आज दिवसभरात ३७६ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनाची बाधा झालेल्या ६९१५ जणांनी या आजारातून मुक्ती मिळविली आहे.
संपादन - नीलेश डाखोरे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.