nurses google
नागपूर

परिचारिकांचे काम बंद आंदोलन, वैद्यकीय सेवा विस्कळीत होण्याची भीती

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : परिचारिकांची रिक्त पदे भरण्यात यावी, समान काम समान वेतन, परिचर्या व्यवसायाचे खासगीकरण करण्यात येऊ नये, कंत्राटी पद्धत बंद करण्यात यावी, एकच मिशन लागू करा, जुनी पेन्शन अशा विविध मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी सोमवारी (ता.२१) नागपुरात मेयो, मेडिकलमधील सुमारे पाचशेपेक्षा अधिक परिचारिकांनी आंदोलन (nurses agitation) केले. यामुळे दोन तास मेयो, मेडिकलमधील (government medical college nagpur) विविध विभागातील कामकाज विस्कळित झाले. मात्र, प्रशासनाने रुग्णसेवेवर परिणाम झाला नसल्याचा दावा केला. आता बुधवार-गुरुवार दोन दिवस काम बंद आंदोलन पुकारण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (nurses will agitate on wednesday and thursday in nagpur)

महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेतर्फे पहिल्या टप्प्यातील आंदोलनाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. पहिले दोन दिवस दोन तासांचे आंदोलन पुकारण्यात येणार आहे. सोमवारी दोन तास परिचारिकांनी मेयो आणि मेडिकलच्या आवारात निदर्शने केली. आज (मंगळवारी)देखील दोन तासांचे आंदोलन होईल. यानंतर बुधवारी दोन दिवस पूर्ण दिवस काम बंद आंदोलन पुकारण्यात येणार आहे.

यासंदर्भातील पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे मंत्री यांना दिले आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेतर्फे जारी करण्यात आली. मात्र, सत्ताधाऱ्यांनी या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे अखेर सोमवारपासून आंदोलनाचा प्रारंभ झाला. केंद्र आणि राज्यातील परिचारिकांच्या वेतनातील तफावत दूर करण्यात यावी, सेवेदरम्यान संरक्षण देण्यात यावे, कोविड भत्त्यामध्ये वाढ करण्यात यावी, कोरोना काळात सात दिवस काम आणि तीन दिवस रजा देण्यात यावी, परिचारिकांच्या शिल्लक रजेचा सोडवण्यात यावा अशा मागण्यांचा पाठपुरावा आंदोलनाद्वारे करण्यात येत आहे.

मेयो असो की, मेडिकल रात्रपाळीतील रुग्णसेवेची जबाबदारी आम्ही घेतो. सारे डॉक्टर ऑन कॉल असतात. अशावेळी अनुचित घटना घडली तर परिचारिकांना मारहाण होते. सेवेदरम्यान संरक्षण मिळत नाही. दोन तासांच्या आंदोलनामुळे सेवा विस्कळित झाली. बुधवार, गुरुवार दोन दिवस सेवा बंद करण्यात येईल. तर २५ जूनपासून बेमुदत संप पुकारण्यात येईल.
-अंकुश खोरगडे, संघटक, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना, मेयो, नागपूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajya Sabha Candidates: राज्यसभा निवडणुकीत भाजपचा सस्पेन्स संपला; दोन राज्यांत उमेदवारांची घोषणा, कोण आहेत चेहरे? एक तर अभिनेत्री

PM Kisan: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पीएम किसानचा २४वा हप्ता कधी येणार? नवी अपडेट समोर

Prithviraj Chavan : ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा देऊन चालणार नाही, तर त्यांना...; पृथ्वीराज चव्हाणांचे घणाघाती आरोप, फौजदारी कारवाईचीही मागणी

मुलांचा आत्मविश्वास वाढवायचा असेल तर लहानपणापासूनच करा ‘या’ गोष्टी; करीना कपूरने सांगितला पालकांसाठी खास सल्ला

Latest Marathi News Live Update : पृथ्वीराज चव्हाण यांची मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर टीका; बडतर्फीची मागणी

SCROLL FOR NEXT