नागपूर : इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहाराचे वाटप करण्यात येते. कोरोना काळात सेंटर किचनमार्फत शिजविलेला आहाराचा पुरवठा झाला नाही. आता विद्यार्थ्यांना वर्षभराचा आहार पुरवठा एकाच वेळी करण्यात येत आहे.
हेही वाचा - घनदाट जंगलात अजूनही उभा आहे अष्टकोनी वाडा, २०० एकर जमीनदारी असलेला परिवार एका रात्रीत...
महापालिकेच्या शाळांसह जिल्ह्यातील एकूण ५१५ शाळांत सेंटर किचनच्या सहाय्याने शिजवलेला आहार पुरविण्यात येतो. कोरोना काळात ते झाले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांची ओरड वाढली. काही शैक्षणिक संस्था, संघटनांनी यावरून बरेच वादळ उठविले. प्रकरण न्यायालयात गेले. शेवटी शिक्षण संचालनालयाने सेंटर किचनअंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना वर्षभराचा आहार पुरवठ्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यातील ७७ हजार ९८५ विद्यार्थ्यांना संपूर्ण आहार वितरित करण्यात येत आहे. पोषण आहार विभागाने पहिला टप्प्यातील पुरवठा म्हणून पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना दोन लाख ६२ हजार ५०३ किलो हरभरा, दोन लाख ३० हजार १९४ किलो मसूर दाळ तर इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना हरभरा तीन लाख ७१ हजार ९७२ किलो तर तीन लाख १५ हजार ६१३ किलो मसूर डाळीचे वाटप केले आहे. पहिली ते पाचवीच्या एका विद्यार्थ्यावर ९९४ रुपये ५६ पैसे तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यावर एक हजार ४८९ रुपये ६२ पैसे धान्यापोटी खर्च होणार आहे. आहारामध्ये मसूर डाळ, हरभरा, चवळी, अख्खा मूग व तूर डाळीचा समावेश आहे.
हेही वाचा - घनदाट जंगलातून वाट काढत बदलतेय ९ गावांचे भाग्य, अवघ्या २१ व्या वर्षी नक्षलग्रस्त भागात बनलीय सरपंच
सात सदस्यीय समिती -
जिल्ह्यातील महानगरपालिकेच्या ४३९, महादूला नगरपालिका हद्दीतील १२, कामठी कटकमंडळाअंतर्गत ४७ व वाडी नगरपालिका क्षेत्रातील १७ अशा ५१५ शाळांचा समावेश आहे. प्राधान्यक्रमाने कडधान्य वाटपाची निवड करण्यासाठी सात सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. पुरवठाधारक एजन्सी म्हणून महाराष्ट्र स्टेट को-ऑप. कंझ्युमर्स फेडरेशन लिमिटेड या संस्थेची निवड करण्यात आली आहे. हे धान्य विद्यार्थ्यांना मिळण्याच्या प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.