obscene dance video viral on social media nagpur crime police sakal
नागपूर

Nagpur News : ‘त्या’ अश्लील नृत्य प्रकरणी गुन्हा दाखल; समाजमाध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नृत्यांगणांवर पार्टीतील लोकांनी पैसेही उधळल्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : एका कॉर्पोरेट कंपनीच्यावतीने वर्धा रोडवरील ‘ली मेरिडियन'' हॉटेलमध्ये आयोजित पार्टीत नृत्यांगणांनी अश्लील नृत्य सादर केले. त्या नृत्यांगणांवर पार्टीतील लोकांनी पैसेही उधळल्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाली.

बेलतरोडी पोलिसांनी याची गंभीर दखल घेऊन पार्टी आयोजकासह तिघांवर गुन्हे दाखल केले. आयोजन शुभम मेहरा, विक्री व्यवस्थापक अमित राज कुंडू आणि हॉटेल सहव्यवस्थापक अंकुश लोंचने अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

वर्धा रोडवरील हॉटेल ‘ली मेरिडियन’ येथे झालेल्या एका मोठ्या कंपनीच्यावतीने पार्टी आयोजित करण्यात आली होती. त्या पार्टीत तोकडे कपडे घातलेल्या तरुणी ‘डान्स फ्लोअर’वर नृत्य करत होत्या. तेथे उपस्थित असलेल्या काही जणांनी नृत्य करणाऱ्या तरुणींवर पैसे उधळले होते.

सोमवारी याबाबत एक चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाली होती. हा कार्यक्रम एका मोठ्या सोलर इन्स्ट्रुमेंट्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनीने आयोजित केलेल्या डीलर्स मेळाव्याचा भाग होता. या कार्यक्रमात शहरातील अनेकांनी सहभाग घेतला होता.

नियमित बैठकीनंतर, सुमारे ८ ते १० तरुणींचे नृत्य सादरीकरण केले गेले. त्यात हा प्रकार घडला. या प्रकाराची दखल बेलतरोडी पोलिसांनी घेतली. पोलिसांनी आयोजन शुभम मेहरा, विक्री व्यवस्थापक अमित राज कुंडू आणि हॉटेल सहव्यवस्थापक अंकुश लोंचने यांच्यावर गुन्हे दाखल केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हिवाळी अधिवेशानात राज्यात लागू होणार समान नागरी कायदा? CM फडणवीसांनी दिली मोठी अपडेट, काय म्हणाले?

Mohol Ganeshotsav : मोहोळ शहरात गणेश मूर्ती खरेदीसाठी मोठी गर्दी, गणेशोत्सवावर दुष्काळाचे सावट गणेश मूर्तीच्या किमती वाढल्या

Marathi News Live Updates : गणरायाच्या आगमनाच्या पहिल्याच दिवशी चंद्रपुरात पोलिसांची कारवाई; डीजेचे साहित्य जप्त

Moon Venus Conjunction Sky Event: चंद्रकोरीसोबत तेजस्वी शुक्राची दुर्मीळ युती; निरभ्र आकाशात नयनरम्य खगोलीय नजारा

Pune News : महापालिकेचे अधिकाऱ्यांना उतरावे लागणार रस्त्यावर; दर शुक्रवारी अहवाल सादर करण्याचे आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT