नागपूर : आठवीच्या विद्यार्थिनीने मोबाईलवर ‘फ्री फायर गेम’ (free fire game) खेळण्यासाठी एक युवक पार्टनर म्हणून शोधला. त्याने चॅटिंगमध्ये गुंतवून तिला अश्लील फोटो आणि व्हिडिओ (offensive photos and video) पाठविण्यासाठी बाध्य केले. मुलीला पैशाची मागणी केली. पैसे न दिल्यामुळे मुलीचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करून तिला जीवे मारण्याची धमकी दिली. (nagpur crime news) रोहित राजपूत ऊर्फ बॅड शहजाद असे आरोपी युवकाचे नाव आहे. (offensive video of student viral on social media nagpur crime news)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १३ वर्षीय मुलगी आठवीची विद्यार्थिनी आहे. तिचे वडील नोकरी करतात, तर आई गृहिणी आहे. पालकांनी ऑनलाइन क्लासेससाठी तिला मोबाईल घेऊन दिला. मात्र, या दरम्यान तिला फ्री फायर गेम खेळण्याची सवय लागली. या गेममध्ये कुणीतर पार्टनर घेऊन खेळावे लागते. सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलीने रोहित राजपूत नावाच्या आयडीने सुरू असलेल्या बॅड शहजाद नावाच्या लिंकसोबत ती गेम खेळत होती. खेळताना दोघांची ओळख झाली. शहजादने तिच्याशी ओळखी वाढवली. तिच्याशी व्हॉट्सॲपवर चॅटिंग सुरू केली. तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून न्यूड फोटो आणि व्हिडीओ पाठविण्यासाठी बाध्य केले.
गेम हरल्यावर भरू शकली नाही २२०० रुपये -
ती गेम हरल्यानंतर तिला २२०० रुपये त्याला द्यायचे होते. त्याने पैशांसाठी तिच्याकडे तगादा लावला. तिने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे शहजादने अश्लील व्हिडिओ पाठवण्यास सांगितले. तिने नकार देताच जुने फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर तिने व्हिडिओ पाठवला. मुलीकडे पैसेच नसल्यामुळे तिने त्याला ब्लॉक केले. त्यानंतर तिचे फोटो त्याने सोशल मीडियावर व्हायरल केले.
वस्तीतील महिलेची सतर्कता -
त्या मुलीचा अर्धनग्न फोटो एका मुलाच्या व्हॉट्सॲपवर आला. त्याने तो फोटो आईला दाखवला. त्या मुलाच्या आईने पिडित मुलीच्या आईला घरी बोलवले. त्यानंतर तिचे फोटो दाखवून पोलिसात तक्रार करण्याचा सल्ला दिला. महिलेने मुलीला घेऊन हुडकेश्वर पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.