Officers ae taking money to empty lands in Nagpur
Officers ae taking money to empty lands in Nagpur  
नागपूर

धक्कादायक! चक्क अधिकारीच घेतात भूखंड रिकामे करून देण्याची सुपारी; नागपूरच्या धंतोली झोनमधील प्रकार

राजेश प्रायकर

नागपूर ः नागरिकांची कामे सहज व सुरळीत होण्यासाठी महापालिकेने केलेल्या नियमावलीचा अधिकाऱ्याकडून वसुलीसाठी उपयोग होत असल्याचा प्रकार धंतोली झोनमध्ये सर्रास होत असल्याचे दिसून येत आहे. एवढेच नव्हे एका जणाने खरेदी केलेला भूखंड मूळ मालकाला परत मिळवून देण्यासाठी अधिकारी सुपारी घेत असल्याचे धक्कादायक प्रकारही सुरू आहे.

शहरात अनधिकृत बांधकाम मोठ्या प्रमाणात आहेत. अर्थात महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे भक्कम पाठबळाशिवाय अनधिकृत बांधकाम शक्य नाही, हे समजण्यासाठी तज्ज्ञाची गरज नाही. अनेक अधिकाऱ्यांचे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांसोबतच ‘अर्थ'पूर्ण संबंध असल्याने ते फोफावत असल्याची गेली अनेक वर्षांपासून चर्चा आहे. धंतोली झोनमध्ये मात्र खरेदी केलेल्या भूखंडांवर टिनाचे शेड तयार करून व्यवसाय करीत असलेल्या नागरिकांचे बांधकाम अवैध ठरवून त्यांना नोटीसवर नोटीस देण्यात येत आहे. 

अनधिकृत बांधकामामुळे रस्त्यावर अतिक्रमण होऊ नये, या हेतूने महापालिकेने नियमावली तयारी केली. परंतु ही नियमावली तसेच यानिमित्त नागरिकांना देण्यात येणारे नोटीस काही अधिकाऱ्यांसाठी वसुलीचा मार्ग ठरला आहे. याबाबत धंतोली झोनमधील एका अधिकाऱ्याने अक्षरशः दुकानच थाटल्याचे काही त्रस्त नागरिकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. नाव पुढे आल्यास हा अधिकारी भूखंडच जप्त करतो की काय? अशा भीतीत नागरिक आहेत. 

विशेष म्हणजे एका व्यक्तीने खरेदी केलेल्या प्लॉटवर टिनाचे शेड टाकून व्यवसाय सुरू केला. या एकाच व्यक्तीला आतापर्यंत अनेकदा नोटीस पाठविण्यात आली. ज्या भूखंडमालकाकडून या व्यक्तीने प्लॉट खरेदी केला. त्यांच्यात व्यवहारावरून प्रकरण सुरू आहे. या अधिकाऱ्याकडून मूळ भूखंडमालकाकडून प्लॉट खाली करून देण्याची सुपारीही घेतली असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 

हे एकच नव्हे असे अनेक प्रकरणे धंतोली झोनमध्ये आहेत. विशेषतः बेलतरोडी रोडवरील अनेक प्रकरणे आहेत. सहायक आयुक्तांचे दुर्लक्ष होत असल्याने या अधिकाऱ्याचे चांगलेच फावले आहे. किंबहुना सहायक आयुक्तांंच्याही डोळ्यात धूळफेक करून त्यांच्या स्वाक्षरीसह नोटीस देण्यात येत आहे. जेथे पक्के बांधकामच नाही, अशा बांधकामाचा नकाशा मंजुरी शक्य तरी आहे का? असा सवाल नोटीस मिळालेल्या काहींनी उपस्थित केला.

नोटीसच्या कागदाची किंमत लाखावर

सामान्य नागरिकांना कष्टाने बांधलेले घर तुटण्याची मोठी भीती असते. नेमक्या याच मानसिकतेचा फायदा घेत धंतोली झोनमधील हा अधिकारी नोटीस देत असल्याचे एकाने नमुद केले. नोटीस दिल्यानंतर तडजोड केली जाते. मनपाच्या नोटीसच्या कागदाची किंमत लाखावर असल्याची चर्चा झोनमध्ये रंगली आहे.

कारवाई का नाही?

झोनमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध बांधकामाची नोटीस दिली जात आहे. मात्र, त्या तुलनेत धंतोली झोनमध्ये अवैध बांधकामावर कारवाई झाल्याचे कुठेही दिसत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात नोटीस देऊनही कारवाई होत नसल्याने अधिकाऱ्यांच्या नोटीस देण्यावरच आता शंका व्यक्त होऊ लागली आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: "केजरीवालांना स्वतंत्र कोठडी अन् साधा कूलरही नाही"; आतिषी यांचा राज्यपालांवर हल्लाबोल

Uddhav Thackeray: फडणवीसांच्या जवळच्या व्यक्तीनं उद्धव ठाकरेंकडं भेटीसाठी मागितली वेळ?; निकालापूर्वीच मोठी घडामोड

Pune Lok Sabha Election Results : कोरेगाव पार्क परिसरात उद्या वाहतुकीत बदल; कोणते आहेत पर्यायी मार्ग, जाणून घ्या..

Hardik Pandya Natasa Stankovic : ट्रोलिंगवर सहानभुतीचा उतारा.. हार्दिकनं मुद्दाम पसरवली घटस्फोटाची अफवा?

Uddhav Thackeray: ...तर ते CCTV फुटेज बाहेर काढावे लागेल, उद्धव ठाकरेंवरील आरोपाने राजकारण ढवळून निघणार

SCROLL FOR NEXT