old man tortured the girl who came home to play with children 
नागपूर

बापरे... त्याने स्वत:च्या नाही, परंतु तिच्याही वयाचा विचार केला नाही 

अनिल कांबळे

नागपूर : नातवंडांसोबत खेळायचे त्याचे वय. परिसरातील मोठ्यांपैकी कुणी त्याला काका तर लहान मुले आजोबा म्हणून संबोधायचे. काही जण ज्येष्ठ म्हणून नमस्कारही घ्यायचे. परंतु वासनांध माणसाला कशाचेही भान राहत नाही, हेच खरे. त्याची वाईट नजर तिच्यावर पडली. परंतु तसा विचार करण्यापूर्वी त्याने स्वत:च्या नाही, परंतु तिच्यातरी वयाचा विचार करायचा होता, असे एकच वाक्‍य आज ज्याच्या त्याच्या तोंडी आहे. काय घडला असावा प्रकार वाचा पुढे... 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला मूळची राजस्थानची असून, ती फेब्रुवारी महिन्यात बहिणीकडे कामठी येथे आली होती. मात्र, लॉकडाऊनमुळे ती गावी परत जाऊ शकली नाही. तिला पाच वर्षे आणि सहा वर्षे वय असलेल्या दोन मुली आहेत. 14 जुलैला सायंकाळी सहा वर्षे वय असलेली मुलगी शेजारी राहणारा आरोपी नरेंद्र मेश्राम याच्या घरी गेली. मेश्रामच्या नातवंडांसोबत ती खेळत होती. दरम्यान, नराधम नरेंद्रची नजर त्या चिमुकलीवर पडली. 

आपल्या नातवंडांसोबत घरी खेळायला आलेल्या मुलीचे वय काय, आपली नातवंड त्या चिमुकलीसोबत खेळत आहेत, याचा साधा विचारही त्याच्या मनाला शिवला नाही आणि घरी खेळायला आलेल्या सहा वर्षांच्या चिमुकलीवर वृद्धाने लैंगिक अत्याचार केला. ही दुर्दैवी घटना कामठी परिसरात उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपीला अटक केली आहे. नरेंद्र मेश्राम (वय 59, कामठी) असे आरोपीचे नाव आहे. 

नातवंडांसोबत खेळायला आलेल्या चिमुकलीला घरात चल, तुला चॉकलेट देतो, असे सांगून घरात नेले. तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. झालेल्या प्रकाराने ती चिमुकली रडत रडत घरी गेली. तिने घडलेला प्रकार सांगितला. तक्रारदार महिला आणि तिची बहीण विचारणा करायला नरेंद्रच्या घरी गेल्या असता त्याने दोघींनाही शिवीगाळ करून हाकलून लावले. त्यांनी थेट कामठी पोलिस स्टेशन गाठले. पोलिसांना हकिकत सांगितल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपी नरेंद्र मेश्राम याला अटक करण्यात आली. 
 

नागरिकांमध्ये संताप 


या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमधून संताप व्यक्‍त होत आहे. नातवंडांसोबत घरी खेळायला आलेल्या चिमुकलीवर वाईट नजर टाकणाऱ्याला जबर शिक्षा व्हावी, अशी मागणीही होत आहे. 

संपादन : अतुल मांगे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: रेल्वेचे दावे कोरडे, डबे मात्र ओले! लोकलच्या छतातून पाण्याचा वर्षाव; रेल्वे प्रशासनावर टीकेचा भडिमार

आधी गाडण्याची तयारी केली, नंतर पतीची हत्या; ४५ दिवसांनी पत्नीचं कांड समोर

Latest Marathi Live Update: मुसळधार पावसाने रेल्वे वाहतूक विस्कळीत, स्थानकांवर गर्दी

Malvan Teacher Transfer : मालवणमध्ये 5 दिवसांपासून शाळा बंद! चांगल्या शिक्षकाच्या बदलीने पालक संतापले; 'त्या' शिक्षकाला परत रुजू न केल्यास दाखले काढून घेण्याचा इशारा

Raj Thackeray Letter : बाळासाहेब, पवार साहेब, महाजन यांनी कोणालाच पाठीशी घातल नाही; राज ठाकरेंची फडणवीसांवर 'सत्तेचा माज, मौनावर' कठोर शब्दांत टीका

SCROLL FOR NEXT