Nagpur: जीर्ण झालेल्या सिवेज लाइनवर ५० कोटी लिटर पाण्‍याचा भार sakal media
नागपूर

Nagpur: जीर्ण झालेल्या सिवेज लाइनवर ५० कोटी लिटर पाण्‍याचा भार

तुंबण्याचे प्रकार वाढले; घरांत सांडपाणी ; आरोग्य धोक्यात

राजेश प्रायकर ः @rajeshp_sakal

नागपूर : शहरातील जवळपास एक हजार किलोमीटरच्या सिवेज लाइन जीर्ण झाल्या असून प्रत्येक वस्तीमध्ये सांडपाणी तुंबण्याचे प्रकार वाढले आहेत. परिणामी नागरिकांच्या घरांमध्ये सांडपाणी परत येत आहे. याविषयी केलेल्या तक्रारीकडे अधिकारीही दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या जीर्ण सिवेज लाइनवर शहरातून दररोज निघणाऱ्या पाचशे एमएलडी अर्थात ५० कोटी लिटर पाण्याचा भार आहे.

शहरातील घरांची तसेच बहुमजली इमारतींची संख्या वाढली. गेल्या दहा वर्षात लोकसंख्याही ३० लाखांपर्यंत गेली. वाढलेले शहर, इमारती, लोकसंख्येनुसार शहरातील पायाभूत सुविधांमध्येही वाढ झाली. रस्ते मोठे झाले, नव्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या. परंतु, जुन्या जीर्ण सिवेज लाईन बदलण्याकडे अद्यापही महापालिकेचे लक्ष नाही. संपूर्ण शहरात एकूण १४७५ किलोमिटर लांबीच्या सिवेज लाइन आहेत. यातील जवळपास हजार किलोमीटरच्या सिवेज लाईन जीर्ण झाल्या आहेत. धरमपेठ, सीताबर्डी, महाल, इतवारीसारख्या वर्दळीच्या भागात तर इंग्रजकालीन सिवेज लाइन असून त्या पूर्णपणे जीर्ण झाल्या आहेत. थोडीफार दुरुस्ती करून महापालिका तात्पुरते मलमपट्टी करते. मल आणि सांडपाण्याचा समावेश असलेले ५० कोटी लिटर पाणी सिवेजमधून वाहून जाणे धोकादायक ठरत आहे. सोबतच प्लॅस्टिक,बहुमजली इमारतींमधील सॅनिटरी नॅपकिन फ्लशच्या माध्यमातून सिवेज लाइनमध्ये येत असल्याने तुंबण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे घरांमध्ये पाणी जमा होऊन नागरिकांना नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.

सिवेज लाइनवर अतिक्रमण

काही नागरिकांनी सिवेज लाइनवरच बांधकाम केल्याने तुंबलेल्या सिवेज लाइन प्रवाहित करण्यास कर्मचाऱ्यांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे.ज्यांनी अतिक्रमण केले, त्यांच्या बाजूच्या घरांमध्ये सांडपाणी शिरत आहे. त्यामुळे वाद, भांडण होत असून शहराचे सामाजिक आरोग्यही बिघडत आहे.

"शेजाऱ्याने सिवेज लाईनवर अतिक्रमण केले. परिणामी सिवेज लाईन तुंबली व फुटली आहे. त्यामुळे शेजाऱ्याच्या घरातील घाण व सिवेजचे सांडपाणी थेट घरात स्वयंपाक खोलीपर्यंत येत आहे. धंतोली झोनमध्ये फेब्रुवारीमध्ये लेखी तक्रार केली. पण अधिकारी लक्ष देत नाहीत."

-विशाखा रामटेके, कौशल्यायननगर, प्रभाग ३३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Organizational Reshuffle : काँग्रेसमध्ये संघटनात्मक मोठे फेरबदल; महाराष्ट्रातील चार नेत्यांना संधी; ८१ सचिवांच्या नियुक्त्या जाहीर

IND vs NZ 1st Test Day 2 Live: अम्पायरचा डोळा लागला अन् लोकेश राहुल वाचला; न्यूझीलंडच्या ताफ्यात गोंधळाचे वातावरण, दुसऱ्या सत्रात नाट्यमय घडामोड

Cyclone Aquan Latest Update : बंगालच्या उपसागरात ‘अक्वान’ चक्रीवादळ तीव्र; महाराष्ट्राला धोका आहे का? जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Pune News: पुण्यात रोज अतिक्रमणांवर हातोडा! ;पुढील दोन महिने कारवाई करण्याचा महापालिका आयुक्तांचा इशारा

Gokul Milk Price Hike : 'गोकुळ', 'वारणा' दूध विक्री दरात सहा रुपये वाढ; उद्यापासून अंमलबजावणी, म्हशीसाठी तीन, गायीसाठी दोन रुपये उत्पादकांना जादा मिळणार

SCROLL FOR NEXT