Worl Health Day 2025 sakal
नागपूर

World Health Day 2025: मनुष्यबळ तोकडे, रुग्णसेवा होणार कशी? कामगार रुग्णालयांत सर्वांसाठी रुग्णसेवेचा आज नारळ फोडणार

World Health Day: जागतिक आरोग्य दिनानिमित्त ७ एप्रिलला ईएसआय रुग्णालयांत सर्वसामान्यांनाही मोफत उपचार मिळणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Shortage of Medical Staff Raises Alarm: जागतिक आरोग्य दिनाच्या पर्वावर सोमवारी (ता.७) सर्व राज्य कामगार विमा सोसायटी रुग्णालयांमध्ये विमाधारक व्यतिरिक्त इतर सर्व सामान्य जनतेलासुद्धा मोफत उपचार उपलब्ध होणार आहेत. ही घोषणा करताना रुग्णालयातील औषधांच्या साठ्यापासून तर मनुष्यबळाच्या दुष्काळाकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले असल्याची जोरदार चर्चा कामगार रुग्णालय वर्तुळात आहे.

राज्यात कामगार विमा रुग्णालयांत उपचार करणारे डॉक्‍टर, परिचारिका, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची ५० टक्के पदे रिक्त आहेत. त्यात अत्याधुनिक साधन सामुग्रीचा अभाव तर आहेच. राज्यातील एकाही कामगार रुग्णलयात रेडिओलॉजी विभागात एमआरआयचे निदान होत नसल्याची माहिती आहे.

केवळ सर्दी, ताप, खोकला आणि संसर्गजन्य आजारांवरील औषधे देऊन उपचाराचा देखावा करणार काय हा खरा सवाल उभा ठाकला आहे. कामगार व त्यांच्या कुटुंबियांच्या औषधोपचाराचा डोलारा सांभाळणे राज्य कामगार विमा सोसायटीला कठीण असताना त्यात महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून कामगार रुग्णालयात इतर रुग्णांवरील उपचाराची घोषणा केली.

विशेष असे की, कामगारांच्या वेतनामधून कपात करून चालवल्या जाणाऱ्या कामगार विमा रुग्णालयांमध्ये कामगारावर उपचार व्हावे यासाठी विशेष रुग्णालये स्थापन केली आहेत. मात्र इसिकने जारी केलेल्या राजपत्रानुसार ज्या कामगार रुग्णालयात मागील दोन वर्षात खाटांची संख्या ६० टक्क्यांपेक्षा कमी झाली आहे, अशा रूग्णालयात सर्व सामान्य जनतेला सुद्धा उपचार देण्यात यावे असे नव्याने सुचविण्यात आले आहे. कामगार सर्व रुग्णालय महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेशी संलग्न झाले आहेत, अशी माहिती पुढे आली आहे.

सोमवारीपेठेतील कामगार रुग्णालय दृष्टीक्षेपात

आधुनिक यंत्रांपासून दूर असलेल्या सोमवारीपेठेतील कामगार रुग्णालयात ३३२ मंजूर पदे असताना यातील पन्नास टक्के पदे रिक्त आहेत. चतुर्थश्रेणीची पदेही मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. उपचारासाठी येणाऱ्या कामगार रुग्ण, कुटुंबियांना मेडिकलमध्ये किंवा खासगीत संलग्न रुग्णालयात उपचारासाठी रेफर केले जाते. हीच स्थिती इतर रुग्णांच्या बाबतीत होण्याची दाट शक्यता कामगार नेत्यांकडून व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Shubman Gill : शुभमन गिलची स्पर्धेतून माघार; ब्लड टेस्टनंतर फिजियोने BCCI ला पाठवला अहवाल अन्...

Toll Free Scheme: ‘समृद्धी’वर चाचणीतच कटला ईव्ही वाहनांचा टोल! शासनाची घोषणा ठरली फोल, तांत्रिक अडचणी पाठ सोडेनात

Dhanashree Verma च्या सपोर्टमध्ये उतरली सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा; म्हणाली, तुझ्या प्रती आदर...! नेटिझन्स म्हणायला लागले....

Latest Marathi News Updates : खड्ड्यांनी ठप्प वाहतूक! करंजाळी घाटात बससह चार वाहने अडकली

SCROLL FOR NEXT