Supriya Sule’s Right to Disconnect Bill 2025 highlights the importance of switching off after work.
sakal
Right to Disconect Bill 2025: सध्या नागपूर मध्ये हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत एक खाजगी विधेयक मांडलं. या विधेयकात कर्मचाऱ्यांना ऑफिस वेळेनंतर कामाशी संबंधित फोन कॉल्स आणि ई-मेल्सकडे दुर्लक्ष करण्याचा कायदेशीर हक्क देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यावर कायदेशीर बंधन नसावे, असा हक्क मिळाल्यास त्याचे रक्षण करण्यासाठी कर्मचारी कल्याण प्राधिकरण स्थापन करण्याचा प्रस्ताव या विधेयकात करण्यात आला आहे.
सुप्रिया सुळे यांनी X (पूर्वीचे ट्विटर)वरच्या त्यांच्या अकॉउंटवर या विधेयकाच्या मांडणीचा व्हिडिओ शेअर केला. त्यात त्यांनी सांगितले की, आजच्या डिजिटल कल्चरमुळे थकवा आणि ताण येतो, तो कमी करून उत्तम आयुष्य आणि निरोगी वर्कलाईफ यांचं संतुलन घडवायला हे विधायक मदत करते.
मध्यंतरी काही उद्योगपतींनी कामाचे तास वाढवून काम करणं हा कामाचा चांगला विकास असल्याचं म्हटलं आहे. पण, हे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. जेव्हा आपण शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्याची काळजी घेतो, तेव्हा आपण जास्त प्रोड्क्टिव्ह होतो, लक्ष केंद्रित राहतं आणि कामात गुंतलेले राहतो. तसेच आरोग्याकडे दुर्लक्ष केलं तर थकवा किंवा इतर आजार होण्याची शक्यता वाढते, ज्याचा परिणाम कामावर होतो. त्यामुळे कामानंतर स्वतःला कामापासून दूर ठेवणं म्हणजेच Disconnect करणं महत्त्वाचं आहे.
कामामध्ये झोकून देणे जितके गरजेचे आहे, तितकेच कामानंतर स्वतःसाठी वेळ काढणेही महत्त्वाचे आहे. स्वतःच्या मानसिक, शारीरिक आणि भावनिक आरोग्याची काळजी घेतली, तर तुम्ही अधिक समाधानी आणि प्रभावी पद्धतीने काम करू शकता. आरोग्य चांगलं असेल तरच आपण आपल्या सर्व जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने पार पाडू शकतो.
कामाशी सतत जोडलेले राहिल्यास शरीरातील 'कोर्टिसोल' (तणाव निर्माण करणारा हार्मोन) वाढतो. डिस्कनेक्ट झाल्याने हा हार्मोन कमी होतो, आणि मन शांत राहते.
कामाचा ताण झोपेवर परिणाम करतो. डिस्कनेक्ट झाल्यास मन शांत होते, झोप चांगली लागते आणि आरोग्य सुधारते.
सतत कामात गुंतलेल्यांना थकवा जाणवतो. डिस्कनेक्ट होणे ही विश्रांतीची संधी देते, ज्यामुळे शरीर आणि मन पुन्हा ताजे होते.
मेडिटेशन, वॉक, व्यायाम, मित्र-परिवारासोबत वेळ घालवणं हे सर्व तुमच्या मानसिक आरोग्यास मदत करतात.
ब्रेनला वेळ दिल्यास तो अधिक स्पष्ट व तीव्र कार्य करतो.
कामाबाहेरील वेळ कुटुंब आणि मित्रांसोबत घालवला तर मन आनंदी राहतं आणि भावनिक आधारही मिळतो.
ब्रेक्स घेतल्यामुळे तुम्ही भावनांना योग्य प्रकारे हाताळू शकता आणि तणावाचा सामना अधिक सकारात्मक पद्धतीने करता येतो.
सर्जनशीलता वाढते
सतत कामात राहिल्यास मेंदू ठराविक साच्यात अडकतो. ब्रेक घेतल्यास नवीन कल्पना सुचतात.
जेव्हा तुम्ही कामातून वेळ काढता, तेव्हा फक्त शरीर नाही, तर मनही 'रिचार्ज' होते. नवीन कल्पना सुचतात, आणि कामातही पुन्हा नव्या उमेदीने उतरणे शक्य होते. त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढणे ही आरोग्यासाठी आणि यशस्वी आयुष्यसाठीची गुरुकिल्ली आहे. म्हणून यावर्षी जागतिक आरोग्यदिनी दररोज स्वतःसाठी वेळ काढण्याचा संकल्प करा आणि निरोगी आयुष्य जगा.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.