one died in two wheeler and truck accident in hingana of nagpur  
नागपूर

हृदयद्रावक! पोटाची खळगी भरण्यासाठी निघाले दोन भाऊ, पण पोलिस ठाण्यासमोर पोहोचले अन् सर्वच संपलं

सकाळ वृत्तसेवा

हिंगणा (जि. नागपूर) : जिल्ह्यातील हिंगणा पोलिस ठाण्यासमोर सिमेंट मिक्सरच्या भरधाव ट्रकने दुचाकीवरील भाजी विक्रेत्याला चिरडले. गीतेश भवसागर (वय १५), असे मृताचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी ९.१५ वाजता घडली. एक जण सुदैवाने बचावला. त्यामुळे कुटुंबीय शोकसागरात बुडाले आहे.

हिंगणा पंचायत समिती ते गुप्ता हॉटेलपर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. यामुळे बरेच दिवस एकेरी वाहतूक सुरू होती. 'पोलिस ठाण्यासमोर वाहतुकीचा चक्काजाम' असे वृत्त प्रकाशित झाले होते. तरीही पोलिस प्रशासनाला जाग आली नाही. २९ जानेवारी रोजी सकाळी इसासनी भीमनगर येथील भाजीविक्रेता हिमांशू भवसागर व त्याचा लहान भाऊ गीतेश भवसागर हे दुचाकीने भाजी बाजारात जात होते. हिंगणा पोलिस ठाण्यासमोर पोहोचताच भरधाव जात असलेल्या सिमेंट मिक्सर ट्रकने त्यांना धडक दिली. दुचाकी चालवणारा हिमांशू बाहेर फेकला गेल्याने बचावला, तर गीतेश ट्रकच्या चाकाखाली आला. त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हिंगणा पोलिसांनी पंचनामा करून शव उत्तरीय तपासणीसाठी हिंगणा ग्रामीण रुग्णालयात पाठविले. याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : IIT मुंबईच्या गेटबाहेर वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; साहिल वाकोडे आत्महत्याप्रकरणी कार्यकर्ते आक्रमक, पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड

Maharashtra Rain Alert : बंगालच्या उपसागरातील 'डीप डिप्रेशन'ची तीव्रता वाढली; महाराष्ट्रात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा, ओडिशा-आंध्र प्रदेश किनारपट्टीवर काय स्थिती?

IND vs AUS, U19 ODI: कर्णधाराचं शतक, सेहवागची फटकेबाजी; द्रविडला विश्रांती अन् युवा भारताचा ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश

Akola Crime : हिवताप अधिकाऱ्यासह लिपिक एसीबीच्या ताब्यात; आरोग्य उपसंचालक कार्यालय परिसरात लाचप्रकरणी कारवाई

Phulambri News : मराठा क्रांती मोर्चाचा तहसीलवर मोर्चा..! अमोल खुणे व अजय बारस्कर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT