One thousand corona patients completed in Nagpur 
नागपूर

कोरोना ब्रेकिंग : या शहराने पार केला हजाराचा पल्ला; गुणाकार पद्धतीने होतेय वाढ

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोना विषाणूचा प्रकोप उपराजधानीत गुणाकार पद्धतीने वाढत आहे. झोपडपट्ट्यांध्ये कोरोना शिरला आहे. यामुळे प्रशासन हादरले आहे. दर दिवसाला दोन आकड्यांमध्ये वाढ होत आहे. या आठवड्यात तब्बल अडीचशे कोरोनाबाधित आढळले आहे. सोमवारीदेखील सकाळच्या सत्रात 29 जण कोरोनाबाधित आढळले. त्यामुळे बाधितांचा अकडा 1034 वर पोहोचला आहे. 

सोमवारी (ता. 15) आढळून आलेले सर्व कोरोनाबाधित पाचपावली व रविभवन विलगीकरणातील आहेत. शहरातील वस्त्यांमध्ये हळूहळू कोरोना चांगलाच पाय पसरत आहे. यामुळे शहरात आता धोका वाढला आहे. तर प्रशासनाची चिंता वाढली आहे. नाईक तलाव, चंद्रमणीनगर, हुडकेश्‍वर रोड सावरबांधे हॉलजवळचे रुग्ण आहेत.

नागपूर शहराने कोरोनाच्या मृत्यूवर नियंत्रण मिळवले आहे. मात्र, कोरोनाबाधितांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला अपयश येत आहे. दररोज दोन आकड्यातील रुग्णसंख्या आढळून येत असल्याचने प्रशासनाने खबरदारी घेण्याचा इशारा दिला आहे. विशेष असे की, रामेश्‍वरी परिसरातील धाडीवाल ले-आउट, आर्यनगर आणि नरसाळा कोरोनाच्या नकाशावर आले आहे. यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सद्या मेडिकल, मेयो आणि एम्समध्ये 360 बाधितांवर उपचार सुरू आहेत. 

  • आतापर्यंत कोरोनाबाधितांचे मृत्यू : 16 
  • आतापर्यत कोरोनामुक्त व्यक्ती : 607 

शहरातील हॉटस्पॉट

  • मोमीनपुरा -247 
  • नाईकतलाव-बांगलादेश-229 
  • सतरंजीपुरा -120 
  • टिमकी-भानखेडा-53 
  • शांतीनगर -22 
  • हंसापुरी -18 

बांगलादेशमधील वाढता आलेख

दररोज वेगवेगळ्या क्षेत्रातून एक-दोन कोरोनाबाधित आढळून येत आहे. मात्र, नाईक तलाव बांगलादेश परिसराचा आलेख वेगाने वाढत आहे. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 229 जण कोरोनाबाधित आढळून आले. यातील 30 जण कोरोनामुक्त झाले असून सध्या 199 जणांवर उपचार सुरू आहे. सर्वाधिक 249 रुग्ण मोमीनपुरा क्षेत्रातून आढळले. त्यानंतर आता नाईक तलाव बांगलादेश सर्वाधिक रुग्णाचा दुसरा परिसर ठरला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET 2026 री-एग्झामचा सुद्धा पेपर झाला लीक? टेलिग्रामवरील दाव्यांची NTA कडून सायबर क्राइमकडे चौकशी

Nagpur News : पुन्हा ‘नीट’ परीक्षा देण्याची हिम्मत नाही; विद्यार्थिनीने गळफास घेऊन संपविले जीवन, सुसाइड नोटमुळे खळबळ

Monsoon Alert: मुंबईत ४.५ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा २४ वेळा धडकणार! सर्वात मोठी भरती कधी येणार? मान्सूनसोबत हाय टाइडचाही धोका

Indian Visa Regulations: परदेशी नागरिकांसाठी भारताचे व्हिसा नियम बदलले; एका चुकीमुळे होऊ शकते मोठी कारवाई!

Pune Vidhan Parishad Election: विधान परिषद निवडणुकीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची माघार; 'या' कारणामुळे घेतला निर्णय

SCROLL FOR NEXT