One thousand eight hundred and eighty six malnourished children in the district
One thousand eight hundred and eighty six malnourished children in the district 
नागपूर

राज्याला लागलेला डाग काही मिटेना... जिल्ह्यात १,८४६ बालके कुपोषित; वाढ कायम

नीलेश डोये

नागपूर  : कुपोषण राज्याला लागलेला डाग असून तो पुसण्यासाठी सरकारकडून कोट्यावधी रुपये खर्च करण्यात येते. यानंतरही नागपूर जिल्ह्याच्या कुपोषित बालकांच्या संख्येत वाढ होत आहे. जिल्ह्यात जुलै महिन्यामध्ये मध्यम तीव्र कुपोषित (मॅम) १४१७ व अति तीव्र कुपोषित ४२९ (सॅम) अशी तब्बल १,८४६ बालके आढळून आली आहेत. गतवर्षी जूून महिन्यामध्ये जिल्ह्यात तीव्र कुपोषित व मध्यम कुपोषित या बालकांची संख्या केवळ ८४८ इतकीच होती.

राज्यातील आदिवासी व दुर्गम भागातील नवजात आणि लहान मुलांचे कुपोषण दूर करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू करण्यात आल्या. या बालकांना ग्राम बालविकास केंद्राच्या माध्यमातून एनर्जी डेन्स न्यूट्रेशन फुड (ईडीएनएफ) आहार देऊन त्यांचे कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

जिल्ह्यात २,३०० वर अंगणवाड्या कार्यरत आहेत. यांच्या माध्यामातून कुपोषित मुलांना पोषण अहार दिला जातो. यात १ लाख ३९ हजारावर ९०५ बालकांचे पूर्व प्राथमिक शिक्षणाबरोबरच त्यांचे पोषण केले जाते. कोरोनामुळे जिल्ह्यात मार्च महिन्यापासून अंगणवाड्या बंद करण्यात आल्या आहे.

बालकांना पोषण आहाराच्या रुपात कडधान्य त्यांच्या घरी जावून पुरविले जात आहे. असे असले तरी मार्च महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात कुपोषित मुलांच्या संख्येत वाढ झाली आहे. कोरोनामुळे अंगणवाडीत पूर्व प्राथमिक शिक्षण बंद असले तरी, मुलांचे वजन, सीबीई कार्यक्रम व पोषण आहाराचे वितरण सुरू आहे.

मार्च महिन्यापासून बालकांना कडधान्याच्या रुपात पोषण आहार येत आहे. यात चणा डाळ, मसुर डाळ, तिखट, हळद, तेल, गहू आदींचा समावेश आहे. पूर्वी अंगणवाडीत शिजलेला आहार येत होता. अंगणवाडीत येणाऱ्या मुलांना तो दिला जात होता. पण मार्चपासून अंगणवाडी बंद असल्याने कडधान्य येत आहे.

पदाधिकारी, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
कुपोषित बालकांच्या संख्येत वाढ होत असताना पदाधिकारी, अधिकाऱ्यांचे लक्ष दिले नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महिला बाल कल्याण समितीच्या बैठकीत यावर साधी चर्चाही झाली नाही. काम आणि कंत्राटाच्या विषयावर चर्चा होत असल्याचे सांगण्यात आले. बालकांच्या कुपोषणावर मात करण्यापेक्षा आपल्याच पोषणावर अधिक भर असल्याची टीका होत आहे.

तालुकानिहाय कुपोषणाची स्थिती

तालुका मार्च २०२०  जुलै २०२०
पारशिवनी २४६        २४५
हिंगणा        ९१          ४७
नागपूर        ६४      १५२
कामठी        ७०        १३६
रामटेक        २२८    २४४
सावनेर      १६४      २४६
भिवापूर    २७      २०
नरखेड      २९        ५०
उमरेड        १९१    २३५
मौदा            २२      ५४
कुही          २५        ४२
काटोल        ६८      २०७
कळमेश्वर    ९१      १६८
एकुण        १३१६    १८४६ ​​

संपादन - नीलेश डाखोरे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : अय्यरची 70 धावांची खेळी, मुंबईसमोर विजयासाठी 170 धावांच आव्हान

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

SCROLL FOR NEXT