One year old child dies after falling from fourth flower 
नागपूर

चौथ्या माळ्यावर एक वर्षाच्या मुलाला आई भरवत होती जेवण; पाण्याचा ग्लास घेण्यासाठी वळली अन्‌...

सकाळ वृत्तसेवा

वाडी (जि. नागपूर) : नागपूर जिल्ह्यातील वाडी येथे सलामे कुटुंब राहतात... त्यांना एक वर्षाचा वेद नावाचा मुलगा व तीन वर्षांची मुलगी आहे... आई वेदला नेहमी गॅलरीत बसून जेवण खाऊ द्यालायची... शुक्रवारीही ती मुलाला घेऊन गॅलरीत गेली... जेवण चारत असताना ती मुलासाठी पाणी घेण्यासाठी गेली... तेवढ्यात वेदचा तोल गेला अन्‌... 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाडी पोलिस ठाण्याअंतर्गत दवलामेटी येथील हिल टॉप कॉलनी, चिंतामनी कॉम्प्लेक्‍समध्ये सलामे कुटुंब वास्तव्यास आहे. आई वेदला जेवण देण्यासाठी गॅलरीमध्ये घेऊन गेली. ती नेहमीच वेदला गॅलरीत जेवण देत होती. मात्र, शुक्रवारी नियतीला काही ओरच मान्य होते.

वेदला जेवण देत असताना आई पाण्याचा ग्लास घेण्यासाठी मागे वळली. काही सेकंदातच स्टूलवर बसलेल्या वेदचा तोल गेला आणि आईचा समोरच गॅलरीतून तो खाली पडला. आईने आरडाओरड केल्याने शेजारचे मदतीला धाऊन आले. शेजाऱ्यांनी वेदला त्वरित रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्‍टरांनी वेदला मृत घोषित केले. घटनेच्या वेळी घरात वेदची आई आणि तीन वर्षांची बहीण होती. वाडी पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून, पुढील तपास करीत आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

आईच्या हातात लागली टी-शर्ट

वेदला जेवण देत असताना आई पाणी घेण्यासाठी मागे वळली. काही क्षणातच टेवलवर मस्ती करीत असलेला वेद चौथ्या माळ्यावरून खाली पडला. ही बाब लक्षात येताच आईने वेदला पकडण्याचा प्रयत्न केला. आईच्या हातात वेदची टी-शर्ट लागली. मात्र, ती त्याला वर ओढू शकली नाही. टी-शर्ट हातून सुटल्याने आईच्या डोळ्यासमोरच वेदचा मृत्यू झाला. 

डेबलावर बसने भोवले

वेदला आईल डेबलावर बसवून जेवण चारत होती. लहान असल्याने वेद डेबलावरच मस्ती करीत होता. तरी आईचे त्याच्याकडे लक्ष होते. पाण्यासाठी आई वळली आणि डेबलावर खेळत असलेल्या वेदचा तोल गेला. तो सरळ चौथ्या माळ्यावरून खाली कोसळला. डेबलावर बसला नसता तर त्याचा जीव वाचला असता.

वेदचे वडील सैन्यात

वेदचे वडील सुरेश सलामे हे भारतीय सैन्यात कार्यरत आहे. त्यांची सध्या पोस्टिंग कोलकाता येथे आहे. त्यांची पत्नी व दोन मुलांसह वाडी येथे राहत होती. गुरुवारी त्यांच्या मुलाचा चौथ्या माळ्यावरून पडून मृत्यू झाला. याची माहिती त्यांना देण्यात आली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : आज अचानक उतरले सोन्याचे दर! किती हजारांनी स्वस्त झालं, पाहा एका क्लिकवर

India vs Pakistan Asia Cup : 'ऑपरेशन सिंदूर'वरून भारताला डिवचणाऱ्या पाकिस्तानच्या खेळाडूंनी किती धावा केल्या? पाहा स्कोअर कार्ड..

BJP Protest : मोदींच्या आईचा AI व्हिडिओ; भाजप महिला आघाडीचे काँग्रेसविरोधात आंदोलन

Latest Marathi News Updates : पावसामुळे रस्त्यांना नदीचे स्वरूप, वाहनचालकांची गैरसोय; नागरिकांना प्रशासनाचे आवाहन

Ahilyanagar Rain Update: 'नेवासे तालुक्‍यात धो-धो पाऊस; शेतकऱ्यांचे नुकसान', कांदा उत्पादकांची धावपळ

SCROLL FOR NEXT