Onion will bring water in the eyes of consumers 
नागपूर

कांद्याने केले गृहिणींचे वांदे; बाराशे रुपयांची वाढ झाल्याने डोळ्यांत आणणार पाणी

राजेश रामपूरकर

नागपूर : दिवाळीच्या तोंडावर कांद्याचे दर कमी झाल्याने ग्राहकांना किंचित दिलासा मिळाला होता. मात्र, दिवाळीच्या सुटीनंतर लासलगाव येथील बाजार समितीत कांद्याचे लिलाव सुरळीत झाल्यानंतर लाल कांद्याला ५१ हजार रुपये उच्चांकी भाव मिळाला. मागील आठवड्याच्या तुलनेत बाराशे रुपयांची वाढ झाली. त्यामुळे स्थानिक बाजारातही कांदा प्रति किलो दहा रुपयांनी महागला आहे. गेल्या आठवड्यात ४० ते ४५ रुपये किलो असलेला कांदा ५० ते ५५ रुपयांवर पोहोचला आहे.

दिवाळीपूर्वी कांद्याच्या वाढत्या दराने सर्वसामान्यांच्या डोळ्यांत पाणी आणले होते. कांद्याचे दर शंभर रुपये किलोच्या घरात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, विदेशातून कांद्याची आयात केल्याने आणि साठवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईचे निर्देश सरकारने दिल्यानंतर भाव घसरले. शेतकऱ्यांकडील कांदा संपत आला असून, गोदामातील कांदाही संपण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे आवक कमी झाली. परिणामी भाव वाढले असून, आवक कमी झाली आहे.

नवीन कांदा येण्यास १५ ते ३० दिवसांचा वेळ लागणार आहे. त्यामुळे नवीन वर्ष उजाडेपर्यंत हेच चित्र बाजारात राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विदेशात कांद्याची मागणी वाढल्याने लासलगाव रेल्वे स्टेशनवरून पहिल्यांदाच पार्सल व्हॅनने बांगलादेशात कांदा निर्यात केली.

लासलगाव रेल्वे स्थानकातून ४८० मेट्रिक टन कांदा बांगलादेशात निर्यातीसाठी रवाना झाला. त्यामुळे येणाऱ्या दिवसांत अशी निर्यात सुरू राहिल्यास कोसळणाऱ्या कांद्याच्या भावात सुधारणा होण्याची शक्यता आहे.

बटाट्यांचे दर चढेच

बटाट्याचे दर चढेच असून, घाऊक बाजारात नेहमी २० ते २५ रुपये किलो असणारे बटाटे कोरोना काळापासून ३० रुपये किलो दराने विकले जात होते. मात्र, घाऊक बाजारातच बटाटे ३२ ते ३६ रुपये किलो झाल्याने किरकोळ बाजारात एक किलो बटाटे ५० ते ६० रुपये किलो झाले आहेत. सध्या कांदा आणि बटाट्याचे दर सारखेच आहेत. नवीन बटाटे बाजारात येण्यासाठी महिना लागणार आहे. त्यामुळे पुढील महिनाभर बटाटे याच दराने खरेदी करावे लागणार असल्याची माहिती विक्रेते विश्वबंधू गुप्ता यांनी दिली.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja First Look 2026 : ही शान कुणाची...! लालबागच्या राजाची पहिली झलक समोर; भव्य मंदिरसदृश प्रवेशद्वार अन् महाकाय त्रिशूळाची चर्चा, पाहा खास Photo

काय राव, सगळ्या DRSचं क्रेडिट तू घेतलंस! ईशान किशन किशनने वैभवला चिडवलं; १५ वर्षांच्या पठ्ठ्यानेही लगेच दिलं भन्नाट उत्तर, नेमकं काय घडलं?

VIRAT KOHLI :लंडनमध्ये विराट कोहली अन् एकनाथ शिंदेंची खास भेट; विकासकामांपासून युवा टॅलेंटपर्यंत झाली चर्चा, नेमकं काय बोलणं झालं?

Latest Marathi News Live Update : मविआचं सरकार पाडण्यासाठी ५ हजार कोटी खर्च, ठाकरेंच्या खासदाराचा गंभीर आरोप

BRICS Summit 2026 : पीएम मोदींनी पुतिन यांना भेट दिलेला 'तिरुक्कुरल' ग्रंथ काय आहे? जाणून घ्या संत तिरुवल्लुवर यांचा इतिहास

SCROLL FOR NEXT