railway. 
नागपूर

रेल्वेच्या तिकीट खिडकीवर नगण्य गर्दी! दिवसभरात केवळ 130 तिकीटांची विक्री?

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनाने सगळे व्यवहारच बंद पडले आहेत. लोकांच्या मनात आजाराविषयी भितीही खूप आहे. त्यामुळे प्रत्येकाला घरीच राहणे योग्य वाटते. परिणामी रेल्वे तिकीटविक्रीची खिडकी सुरू होऊनही प्रवाशांचा प्रतिसाद आँनलाईन तिकीट खरेदीलाच आहे. त्यामुळे तिकीट खिडकीवरील तिकीट विक्रीची संख्या नगण्य आहे.
 रेल्वे तिकीट काऊंटर अखेर शुक्रवारपासून सुरू झाले. तिकीट विक्रीला प्रवाशांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळाला. यामुळे सर्वच काऊंटवर शांतता होती. पहिल्या दिवशी नागपूर स्टेशनवरून केवळ 42, अजनी केंद्रावरून 10 तर मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील काउंटरवरून एकूण 130 तिकीटांची विक्री झाली.
कोरोना संकटामुळे 22 मार्चपासून रेल्वेचे तिकीट काऊंटर बंद करण्यात आले होते. रेल्वेने 200 प्रवासी गाड्या चालविण्याची घोषणा केली. त्यासोबतच 2 महिन्यानंतर मोजक्‍या स्थानकांवर तिकीटविक्री सुरू झाली आहे. नागपूरमार्गे 14 गाड्या धावणार आहेत. त्यासाठी काऊंटरवरून तिकीट विक्री सुरू करण्यात आली आहे. या गाड्यांचे बुकिंग पूर्वीच ऑनलाईन पद्धतीने फुल्ल झाले आहे. जागाच नसल्याने प्रवासीही खिडक्‍यांपर्यंत पोहोचले नसल्याचे चित्र आज दिवसभर दिसून आले. नागपूर स्टेशनवरून 42 तिकीटांची विक्री झाली. त्यातून 42 हजार 850 रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले. अजनीच्या काउंटरवरून 10 तिकीट विकल्या गेल्या त्यातून 10 हजार 890 रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले. या शिवाय इतवारी रेल्वे स्थानकावरही 2 तिकीट काऊंटर सुरू करण्यात आले आहे. तिथून 78 तिकीटे विक्री करण्यात आली. एकूण 49 हजार 520 रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले.

सविस्तर वाचा - सावली सोडणार तुमची साथ
तिकीट घेणाऱ्यांपेक्षा तिकीट रद्द करून परतावा मिळविण्यासाठी येणाऱ्यांचीच संख्या अधिक होती. मध्य रेल्वेच्या काउंटरवरून तिकीट रद्द करण्यासाठी येणाऱ्यांना परतविण्यात आले. तर इतवारी स्टेशनवर 41 तिकीटे रद्द करून 47 हजार 860रुपयांचा परतावा देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईतील ट्रायडंट हॉटेल अडचणीत! बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचा आदेश; बीएमसीचा अल्टिमेटम, प्रकरण काय?

'T20 वर्ल्ड कपमधून डच्चू मिळाला, आता शुभमन गिल... ', पुजाराचे IPL 2026 साठी गुजरात टायटन्सबाबत मोठं भाकीत

Baby Girl Born : गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कन्यारत्नाचे आगमन... आणि तेही रुग्णवाहिकेत! ; ‘१०८’ टीम ठरली देवदूत

Latest Marathi News Live Update : जळगावच्या होलसेल बाजारात इंडक्शन व इलेक्ट्रिक शेगड्यांचा तुटवडा

Broiler Chicken : बॉयलर जिवंत कोंबड्यांना उच्चांकी दर; चिकनच्या दरात मोठी वाढ

SCROLL FOR NEXT