Only 25 percent or 100 people are allowed to attend the wedding Nagpur NMC news 
नागपूर

लग्नासाठी पुन्हा नवीन आदेश : २५ टक्के किंवा १०० जणांनाच उपस्थित राहण्याची परवानगी

राजेश प्रायकर

नागपूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महापालिका आयुक्तांनी कठोर पाऊले उचलण्यास सुरवात केली आहे. आतापर्यंत मंगल कार्यालय, लॉनमध्ये क्षमतेच्या ५० टक्के नागरिकांच्या उपस्थितीला परवानगी होती. आता आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केवळ २५ टक्के किंवा १०० जणांच्या उपस्थितीलाच परवानगी दिली आहे. एवढेच नव्हे दंडाच्या रकमेतही ५० हजारांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. हे आदेश आजपासून लागू करण्यात आले आहे.

शहरात मागील काही दिवसांत दररोज पाचशेपर्यंत कोरोनाबाधित आढळून येत आहेत. आयुक्तांनी कठोर पाऊले उचलण्याचे संकेत यापूर्वीच दिले होते. त्यांनी मंगल कार्यालय, लॉन यात होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण लावण्यासाठी नवे आदेश काढले. मंगल कार्यालय किंवा लॉनमध्ये क्षमतेच्या २५ किंवा १०० व्यक्तींनाच प्रवेश राहणार आहे. त्यामुळे आतापर्यंत मिळालेल्या सवलतीमुळे शेकडो पत्रिका छापून हजारोंच्या संख्येने वऱ्हाड बोलाविण्याच्या बेतात असलेल्यांची निराशा होणार आहे.

अनेकांना धुमधडाक्यात लग्न करण्याचा बेत रद्द करावा लागणार आहे. केवळ १०० लोकांमध्येच लग्न लावता येणार आहे. एवढेच नव्हे समारंभासाठी आयुक्त झोनमध्ये सहायक आयुक्तांकडे कार्यक्रमाच्या आठ दिवसांपूर्वी पूर्वसूचना द्यावी लागणार आहे. परवानगी दिलेल्या १०० पेक्षा जास्त नागरिक समारंभात आढळून आल्यास दंडाच्या रकमेतही वाढ करण्यात आली.

निर्देशाचे उल्लंघन करताना पहिल्यांदा सापडल्यास १५ हजार रुपये, दुसऱ्यांदा सापडल्यास २५ हजार तर तिसऱ्यांदा सापडल्यास ५० हजार रुपयांचा दंड मंगल कार्यालय, लॉन संचालकांवर ठोठावण्यात येणार आहे. एवढेच नव्हे समारंभाचे आयोजक वर किंवा वधू पित्यावरही दहा हजारांचा दंड आकारण्यात येणार आहे.

सात मंगल कार्यालयांवर दंड

मनपाच्या उपद्रव शोध पथकाने शहरातील सात सभागृहांवर कारवाई केली. लक्ष्मीनगर झोनमधील पराते सभागृह, गोल्डन लिफ लॉन, साईबाबा सभागृह, धरमपेठ झोनमधील कुसुमताई वानखेडे सभागृह, नेहरूनगर झोनमधील जट्टेवार मंगल कार्यालय तसेच सतरंजीपुरामधील प्रीतम सभागृहावर प्रत्येकी पाच हजारांचा दंड ठोठावला. एकूण ३७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : मध्य प्रदेशातील सांवर येथे भिंत कोसळून चार महिलांचा मृत्यू, पाच जण जखमी

Otur News : जुन्नर तालुक्यात प्रस्तावित कल्याण–लातूर जनकल्याण महामार्गाला तीव्र विरोध; शेतकरी आक्रमक, धरणे आंदोलनाला सुरुवात

SCROLL FOR NEXT