नागपूर

दिलासा! शहरात फक्त ५९२ पॉझिटिव्ह; ११ जणांचा मृत्यू

राजेश चरपे

नागपूर : कोरोनाची coronavirus दुसरी लाट ओसरत असून बुधवारी झालेल्या २० हजार चाचण्यांमधून फक्त शहरातील ५९२ रुग्ण पॉझिटिव्ह (592 patients positive) आढळले. त्यामुळे सर्वांनाच मोठा दिलासा मिळाला आहे. याशिवाय आरोग्य आणि प्रशासकीय यंत्रणेवरचाही ताण कमी होऊ लागला आहे. (Only 592 corona positive in the city)

बुधवारी जिल्ह्यात एकूण १३७१ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यापैकी ५९२ शहरातील तर ग्रामीण भागातील ७८० रुग्णांचा समावेश आहे. बुधवारी जिल्ह्यात एकूण ३६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यात शहरातील ११ जणांचा समावेश आहे. शहरात बाधितांची संख्या कमी होत असल्याने प्रशासन तसेच नागरिकांतही समाधान आहे.

गेल्या काही दिवसांपासून रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे. मात्र मृतांची संख्या चिंताजनक होती. त्यातही आता मोठी घट झाल्याचे दिसून येते. आज जिल्ह्यातील एकूण ३७७८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या ४ लाख ३६ हजार ६९५ इतकी आहे. अद्याप २१ हजार ५२८ रुग्ण कोरोनाशी लढा देत आहेत.

आकडेवारीत झपाट्याने घट

विशेष म्हणजे दोन आठवड्यांपूर्वी जिल्ह्यातील करोना रुग्णांच्या संख्येत सरासरी पाच हजारांची भर पडत होती. ती आता हजारावर येऊन ठेपली आहे. महिन्याभरापासून सुरू असलेले लॉकडाऊन, लसीकरणाचा वाढलेला वेग आणि वेळेवर उपचार मिळू लागल्याने रुग्णांची आकडेवारी झपाट्याने घटत असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

(Only 592 corona positive in the city)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT