नागपूर : आयआयटी, एनआयटी व तत्सम राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी संस्थांसाठी तसेच इतर सर्व अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रथम वर्षास प्रवेशासाठी जेईई व सीईटी परीक्षा घेण्यात येतात. या परीक्षेसाठी देशभरातून लाखो विद्यार्थी बसतात. मात्र, यापैकी केवळ चार टक्केच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत असल्याची माहिती समोर आली असून ९६ टक्के विद्यार्थ्यांसाठी आयआयटी प्रवेश दिवास्वप्न ठरत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
बारावीनंतर आयआयटी प्रवेशासाठी लाखो विद्यार्थी जेईईची तयारी करीत असतात. अकरावीत प्रवेश घेण्यापूर्वीच क्लासेसमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी पालकांच्या रांगा लागलेल्या असतात. क्लासेसकडून मोठ्या प्रमाणात शुल्क वसूल करुन पालकांची लूट केल्या जाते. त्यातूनच विद्यार्थ्यांना आयआयटी होण्याचे स्वप्न दाखविण्यात येते. राष्ट्रीय स्तरावर जेईई-२०२० साठी ९ लाख २१ हजार २६१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
विशेष म्हणजे आयआयटी, ट्रिपल आयटीमध्ये प्रथम वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमात १७ हजार ६२७ जागा उपलब्ध आहे. एनआयटीमध्ये (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी)१९ हजार २३९ जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे आयआयटी, ट्रिपल आयटी आणि एनआयटीमध्ये ३६ हजार ८६६ जागा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. हे प्रवेश परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ४ टक्केच आहे. त्यामुळे ९६ टक्के विद्यार्थी जेईई आणि सीईटी उत्तीर्ण होऊनदेखील प्रथम वर्ष प्रवेश घेऊ शकत नसल्याचे चित्र आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.