खापरखेडा : लाचलुचपतप्रकरणी दोन पोलिसांवर कारवाई करताना एसीबीचे पथक.  
नागपूर

खुद्‌द दोन पोलिस कर्मचारीच अडकले जाळ्यात, काय केले होते त्यांनी...

दिलीप गजभिये

खापरखेडा (जि.नागपूर): "सद्‍रक्षणाय खलनिद्रनाय' म्हणून पोलिस खात्याविषयीचे ब्रिदवाक्‍य आहे. परंतू कायदयाच्या रक्षकांनीच खाकी वर्दीला न शोभणारे कृत्य केले असेल तर त्याला काय म्हणावे?खापरखेडा पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी लाचलुचपत विभागाच्या जाळयात अडकल्याची घटना घडली. या प्रकरणावरून परिसरात पोलिस खात्याविषयी शंका कुशंका व्यक्‍त करण्याची नागरिकांना संधी मिळाली आहे.

अधिक वाचा : फायनन्स कंपन्यांकडून छळ, ऑटोचालकांनी जिल्हाधिका-यांकडे केली "ही' मागणी....

"एंट्री'ची रक्‍कम मागण्याचा गुन्हा
पोलिस ठाण्याच्या हद्दीतून वाळूची वाहतूक होण्यासाठी "एंट्री'ची रक्कम मागण्याच्या गुन्ह्यात नागपूर एसीबीच्या चमूने खापरखेडा पोलिस ठाण्याचे दोन कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. ही कारवाई मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास करण्यात आली.कोराडी येथील तक्रारकर्ते अमित सरोदे यांचे कोराडी येथे मटेरियल सप्लायरचे काम आहे. 5 जूनला सायंकाळी सरोदे यांचा वाळूने भरलेला ट्रक अवैधरीत्या वाहतूक करीत असताना खापरखेडा पोलिसठाण्यातील उमेश ठाकरे आणि सुरेंद्र ठाकरे यांनी दहेगाव येथे पकडून खापरखेडा पोलिस ठाण्यात जमा केला. यावेळी अवैध वाळू वाहतुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावेळी प्रकरण सेटलमेंट करण्यासाठी फिर्यादीने 60 हजार रुपये दिल्याने तो या पोलिस कर्मचाऱ्यांवर चिडून होता. ट्रकने वाळूची वाहतूक करता यावी यासाठी अमितने सुरेंद्र ठाकरे या खापरखेडा येथील पोलिस कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला.

अधिक वाचा : काम सुरू, रस्ता बंद आहे, मात्र आजकाल कुत्रंही तिकडे फिरकत नाही, काय आहे गोम...

असा रचला सापळा
सुरेंद्र ठाकरे हे खापरखेडा पोलिस ठाण्यात डीबी पथकात कार्यरत आहेत. सुरेंद्र यांनी वाळूच्या वाहतुकीसाठी "एंट्री' दरमहा एक गाडीसाठी पाच हजार रुपये सांगितले. तक्रारदार अमित याने नागपूर एसीबी कार्यालयात संपर्क साधून सुरेंद्र ठाकरे वाळूच्या वाहतूकसाठी पाच हजार रुपये लाच मागत असल्याची तक्रार दिली. पोलिस निरीक्षक योगिता चाफले यांच्या नेतृत्वात सुरेंद्र ठाकरे यांना रंगेहाथ
पकडण्यासाठी सोमवारी खापरखेडा पोलिस ठाण्याच्या बाहेर ट्रॅप लावण्यात आला. मात्र, यात यश न आल्याने मंगळवारी पुन्हा ट्रॅप लावण्यात आला.

अधिक वाचा :  पावसाळा सुरू झाला...तुम्हाला माहित आहे का? कोणता पाउस मानला जातो हानीकारक

दोन्ही पोलिस कर्मचा-यांना अटक
यावेळी 5,000 हजार रुपये लाचेची देवाण-घेवाणीबाबत अमित आणि सुरेंद्र यात चर्चा झाली. रक्कम घेतेवेळी सुरेंद्र यांनी रक्‍कम न घेता वाहतूक विभाग खापरखेडा पोलिस ठाण्यातील कार्यरत अमोल काळे यांना पैसे घेण्यास सांगितले. अमोल काळे यांनी रक्कम हातात घेल्यानंतर लगेच एसीबीच्या पथकाने अमोल यास रंगेहाथ पकडले. सुरेंद्र ठाकरेलाही पोलिस ठाण्याच्या आवारातून एसीबी पथकाने ताब्यात घेतले. ही कारवाई एसीबीचे एसपी रश्‍मी नांदेडकर आणि अपर एसपी राजेश दुधलवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक योगिता चाफले, पोलिस निरीक्षक विनोद आडे, कर्मचारी रविकांत डहाट, सुनील कळंबे, प्रवीण पडोळे, अनिल, मंगेश कळंबे, सरोज बुधे, अस्मिता मेश्राम यांनी केली.

संपादन : विजयकुमार राऊत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shirur Accident : पुणे-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात, रांजणगाव गणपती येथे आरामबसची दोन वाहनांना धडक; १६ प्रवासी जखमी, चार गंभीर

Prakash Abitkar : कोल्हापूरकरांसाठी दिलासा! अखेर गुळगुळीत रस्ते मिळणार; पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी ४०९ कोटींचा प्रस्ताव केला सादर

"तुमचे views वाढवण्यासाठी चुकीच्या बातम्या छापू नका" मालिका सोडण्याच्या चर्चांवरून तेजश्रीने माध्यमांना झाप

Satara Doctor Case : फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरण - उपसभापति नीलम गोऱ्हेंची कठोर भूमिका, पोलिसांना चार्जशीट दाखल करण्याचे निर्देश

Latest Marathi News Live Update : ठिणगी पडताना दिसत आहे जय महाराष्ट्र! - संजय राऊतांचं ट्वीट

SCROLL FOR NEXT