नागपूर

Life Imprisonment: अखेर 'त्या' अनाथ मुलीला मिळाला न्याय, त्या सात नराधमांना मरेपर्यंत जन्मठेप

Nagpur Latest News: सीताबर्डी येथील २०१७ मधील घटना; अनाथ मुलीवर केला होता रात्रभर अत्याचार

सकाळ वृत्तसेवा

Nagpur Crime: शासकीय मुलींच्या वसतिगृहातून पळून आलेल्या १६ वर्षीय अनाथ अल्पवयीन मुलीवर रात्रभर अत्याचार करणाऱ्या सात नराधमांना जिल्हा व सत्र न्यायालयाने (पोक्सो विशेष) मरेपर्यंत सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

तसेच, प्रत्येकी १८ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्षांच्या अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तर, त्यांना मदत करणाऱ्या चार आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. २१ एप्रिल २०१७ रोजी घडलेल्या या घृणास्पद घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरून गेले होते.

या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. न्या. पी. पांडे यांनी निर्णय दिला. बाबा ऊर्फ अतुल ऊर्फ नरेश जनबंधू (वय २९, रा. कुशीनगर, जरीपटका), फिरोज अहमद जमिल अहमद (वय ४७, रा. तहसील), चिंट्या ऊर्फ स्वप्नील देवानंद जवादे (वय ३४, रा. राहुलनगर, सोमलवाडा), मयूर रमेश बारसागडे (वय ३०, रा. इंदोरा लघुवेतन कॉलनी), कृष्णा हरिदास डोंगरे (वय ३१, रा. गौतमनगर, खामला), जीतू ऊर्फ चन्नी रमेश मंगलानी (वय २९, रा. व्यंकटेशनगर, खामला) आणि सचिन गोविंदराव बावणे (वय २९, रा. दर्ग्याजवळ, कुंभारटोली) असे या नराधम आरोपींची नावे आहेत. याच प्रकरणात आरोपींना साहित्य पुरविणारे प्रलय चंदू मेश्राम व सोमिल अशोक नरखेडकर तसेच चौकीदार सुरेश दामोदर बारसागडे आणि मनोहर अडकू साखरे यांना न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले.

पीडित मुलगी घटनेच्या वेळी १६ वर्षांची होती. काटोल रोडवरील वसतिगृहातून पीडितेसह चार अल्पवयीन मुली २० एप्रिल २०१७ रोजी सकाळी तेथून पळाल्या.पान २ वर

रात्री त्या सीताबर्डीतील एका दुकानाच्या आडोशाला थांबल्या आणि २१ एप्रिलला सकाळी त्यापैकी तिघी निघून गेल्या. ही मुलगी याच भागात थांबली. रात्री १० वाजता ती सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या बाजूला असलेल्या मॉल जवळील फुटपाथवर बसून होती. भुकेने व्याकूळ झाल्यामुळे रडत होती. आरोपी फिरोज, त्याच्या दुकानातील नोकर मयूर, बाबा आणि चिंट्या तिच्यावर नजर ठेवून होते. या चौघांनी तिला का रडते, अशी विचारणा केली. तिने खूप भूक लागल्याचे सांगताच आरोपींनी जेवणाचे आमिष दाखवून चिंट्याच्या ऑटोत बसवले. त्यानंतर तिला जरीपटक्यातील सुगतनगर मधल्या बांधकाम सुरू असलेल्या प्रतीक्षा अपार्टमेंटमध्ये नेले. तेथे तिच्यावर चारही जणांनी रात्रभर आळीपाळीने बलात्कार केला. पहाटे चारच्या सुमारास आरोपींनी तिला ऑटोत बसवून पुन्हा सीताबर्डीत आणून सोडले. न्यायालयाने एकूण २४ साक्षीदारांची साक्ष नोंदविली. शासनातर्फे ॲड. माधुरी मोटघरे यांनी बाजू मांडली.

पीडिता नवव्या वर्षांपासून अनाथालयात

पीडितेच्या व्यसनाधीन वडिलांचे निधन झाल्यानंतर काही दिवसांतच आईचाही मृत्यू झाला. नऊ वर्षांची असताना नातेवाइकांनी तिला श्रद्धानंद अनाथालयात आणून सोडले. २०१६ मध्ये तेथून ती काटोल मार्गावरील शासकीय वसतिगृहात पोहचली. तत्पूर्वी, सुधारगृहातून पळून गेल्याचा गुन्हा सदर पोलिस ठाण्यात दाखल झाल्यानंतर ही मुलगी आणि तिच्यासोबतच्या तीन अन्य मुलींबाबतची माहिती शहरातील सर्वच पोलिस ठाण्यांमध्ये कळविण्यात आली होती.

तिघांकडून दुसऱ्या दिवशीही अत्याचार

सीताबर्डी येथून दुसऱ्या दिवशी अन्य तिघांनी तिला बळजबरीने आपल्यासोबत खामला येथे नेले. खामला परिसरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला व परत सीताबर्डी परिसरात आणून सोडले. सकाळी या भागात कर्तव्यावर असलेल्या एका वाहतूक शाखेच्या पोलिसाला तिची अवस्था बघून संशय आला. अल्पवयीन निराधार मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचे कळताच पोलिस यंत्रणा हादरली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT