over 3500 beds available in nagpur for corona  
नागपूर

नागरिकांनो घाबरू नका! नागपुरात तब्बल साडेतीन हजार बेड्स उपलब्ध; झोननिहाय ५ रुग्णवाहिका  

राजेश चरपे

नागपूर:  महापालिकेने कोरोना रुग्णांसाठी शहरातील एकूण ५३ रुग्णालये सेवेत उपलब्ध करून दिली असून त्यात ६ शासकीय आणि ४७ खाजगी रुग्णालयांचा समावेश आहे. त्यामुळे सरकारी आणि खाजगी मिळून एकूण ३ हजार ४३६ बेड्स उपलब्ध झाले आहेत.

कोरोबाधित रुग्णांना रुग्णालयांमधील बेड्सची वर्तमानस्थिती लक्षात यावी यासाठी केंद्रीय नियंत्रण कक्ष क्रमांक जारी करण्यात आला आहे. ०७१२ - २५६७०२१ या क्रमांकावर फोन करून रुग्णांना शहरातील रुग्णालयातील बेड्सची उपलब्धता जाणून घेता येत आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी केंद्रीय नियंत्रण कक्ष क्रमांकाच्या १० लाइन उपलब्ध करण्यात आल्या आहेत. 

नागरिकांना गरजेच्या वेळी अचूक माहिती मिळावी, त्यांची भटकंती होऊ नये यासाठी मनपातर्फे ‘डॅशबोर्ड’ सुद्धा तयार करण्यात आले असून यामध्ये सर्व खाजगी रुग्णालयांद्वारे त्यांच्याकडील बेड्सची ‘रियल टाइम माहिती अपडेट केली जाते. कोविड संदर्भात नागरिकांना जलद प्रतिसाद मिळून त्यांना सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी मनपातर्फे कार्यवाही करण्यात आली आहे. त्याद्वारे झोनस्तरावर यंत्रणा बळकट करण्याचे कार्य करण्यात आले. 

अतिजोखमीच्या कोरोनाबाधित रुग्णाला जलद उपचार घेता यावे यासाठी त्याच्या जवळच्या भागातून रुग्णवाहिका उपलब्ध होणे आवश्यक आहे. यासाठी झोनस्तरावर उपाययोजना करण्यात आल्या आहे. मनपाद्वारे एकूण ६५ रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली असून त्यामधून प्रत्येक झोनला प्रत्येकी ५ रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आल्या आहे. यासाठी झोनस्तरावर नियंत्रण कक्षही स्थापित करण्यात आले आहे.

अडचणी सोडवण्यासाठी ‘कोरोना मित्र’

खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना येणा-या अडचणी सोडविण्यासाठी प्रत्येक खाजगी रुग्णालयांमध्ये एक ‘कोरोना मित्र’ नियुक्त करण्यात आले आहेत. खाजगी रुग्णालयांसंदर्भात कुठलीही तक्रार नागरिकांना असल्याची त्याची माहिती त्वरित ‘कोरोना मित्रा’ला देण्यात यावी, असे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Strict Action : मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग अन् भेसळीला पूर्ण बंदी! आयुक्त तुकाराम मुंढेंकडून कडक नियमावली जारी; नियम मोडल्यास थेट कारवाई

Medical Courses : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या फेरीतील प्रवेशासाठी शुक्रवारपर्यंत मुदतवाढ

Latest Marathi News Update: लैंगिक शोषणप्रकरणी कोऱ्हाळे खुर्द येथील तरुणावर गुन्हा

नाना पाटेकरांनी सिंहगडाच्या पायथ्याशीच फार्महाऊस का बांधलं? पुरुषोत्तम बेर्डेंनी सांगितलं कारण, म्हणालेले- इथून महाराजांचे...

Akola District Drought : दुष्काळाच्या झळा; लोणी गावातील दुग्ध व्यवसाय संकटात! पाणी आणि चाऱ्याअभावी पशुपालक हवालदिल; म्हशी विकण्याची वेळ

SCROLL FOR NEXT