नागपूर

corona update : पंधरा दिवसांत एक लाखावर व्यक्तींची कोरोनावर मात

केवल जीवनतारे

नागपूर : कोरोना (corona) विरोधातील लढ्याला लशीचा बुस्टर डोस मिळत असल्याने आरोग्य क्षेत्राला आलेली मरगळ काही अंशी का होईना झटकून निघत असल्याचे चित्र दिसत आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाची साखळी दीड महिन्यानंतर सैल झाली आहे. दर दिवसाला बाधितांसह मृत्यूचे नवनवे विक्रम होत होते. मात्र, आता कोरोनाचा प्रकोप निवळला. मे महिन्याच्या पंधरा दिवसात ५४ हजारांवर बाधित आढळले. तर १ लाख १२ हजार व्यक्तींनी कोरोनावर मात केली. तर शनिवारी (ता. १५) ४५ दिवसांनंतर जिल्ह्यात कोरोनाच्या मृत्यूंची संख्या पन्नासच्या खाली (The death toll is below fifty) आली आहे. तर बाधितांची संख्या दीड हजारावर आली आहे. (Over a million individuals overcame the corona in a fortnight)

जिल्ह्यात दुसऱ्या लाटेने प्रचंड हाहाकार माजविला होता. दैनंदिन मृतांच्या संख्येने उच्चांकी ११३ मृत्यूची नोंद जिल्ह्यात झाली आहे. तर बाधितांच्या संख्येनेही जवळपास साडेआठ हजाराच्या टप्पा गाठला होता. मात्र, पंचेचाळीस दिवसांनंतर २४ तासांमध्ये १ हजार ५१० नव्याने कोरोनाबाधित आढळले. तर ४८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.

यापूर्वी ३ एप्रिल २०२१ रोजी ४७ कोरोनाबळींची नोंद करण्यता आली होती. त्यानंतर सातत्याने जिल्ह्यात ८० ते १०० च्या घरात दैनंदिन मृत्यू नोंदवले आहेत. शनिवारी मृत्यू झालेल्यांमध्ये शहरातील २२, ग्रामीणमधील १४ व जिल्हाबाहेरील १२ जणांचा समावेश आहे. यामुळे आतापर्यंत एकूण कोरोनाबळींची संख्या ८ हजार ५२० वर पोहोचली आहे. नागपुरात आज २,७०० वर ऑक्सीजनसह आयसीयू व व्हेंटिलेटर असलेल्या खाटा रिकाम्या आहेत. यामुळे प्रशासनावरील ताणही कमी झाला आहे.

शनिवारी शहरात १० हजार ०८१ तर ग्रामीण भागात १ हजार ५३० अशा जिल्ह्यात ११ हजार ६११ चाचण्या झाल्या. यापैकी १ हजार ५१० जणांचे अहवाल बाधित आढळले. यात शहरातील ७७४, ग्रामीणचे ७२४ व जिल्ह्याबाहेरील १२ जणांचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख ६२ हजार ११० झाली आहे. मे महिन्याच्या पंधऱा दिवसात ५४ हजार ३२३ जण कोरोनाबाधित झाले. तर १ लाख १२ हजार ६०१ जण कोरोनामुक्त झाले.

कोरोना रिकव्हरी रेट ९१ टक्क्यांवर

जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती हळूहळू सुधारत असल्याने जिल्ह्यात दैनंदिन बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्तांचे प्रमाण दुपटीहून अधिक वाढले आहे. शनिवारला शहरातील २५११ व ग्रामीणचे २२६९ असे ४७८० लोक ठणठणीत होऊन आपल्या घरी परतलेत. जिल्ह्यातील एकूण कोरोनामुक्तांची संख्या ४ लाख २० हजार ३३१ वर गेली असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ९१ टक्क्यांवर पोहोचले आहे. सध्यस्थितीत जिल्ह्यात केवळ ३३ हजार २५९ सक्रिय रुग्ण आहेत. यातील २६ हजार १२२ रुग्ण गृहविलगीकरणात आहेत.

(Over a million individuals overcame the corona in a fortnight)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT