Over two lakh corona-affected in Nagpur district 
नागपूर

नागपूर जिल्ह्यात कोरोनाबाधित दोन लाखांवर; ३,७१७ बाधित; ४० मृत्यू 

केवल जीवनतारे

नागपूर : आठ दिवसांपासून दर दिवसाला ३ हजार पार कोरोनाबाधितांची संख्या आढळून येत आहे. ११ मार्च 2020 पासून तर आजपर्यंत जिल्ह्यात कोरोनाचे २ लाख ३ हजार ४८८ रुग्ण आढळून आले आहेत. तर बुधवारी नव्याने जिल्ह्यात ३ हजार ७१७ कोरोनाबाधित आढळले. तर ४० जणांचे कोरोनाने बळी घेतले आहे.

कोरोनाने नागपुरात दस्तक देऊन एक वर्षाहून अधिक कालावधी लोटला आहे. परंतु नवीन वर्षामध्ये मार्च महिन्यात कोरोनाने नवीन तांडव सुरु केले आहे. त्यामुळे प्रशासनाने चिंतेत आले आहे. कोरोनाच्या संख्येने दोन लाखाचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या १ ते २४ मार्चपर्यंतचा विचार केल्यास या कालावधीत जिल्ह्यात तब्बल ५३ हजार ७०० कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

२०२० मध्ये ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये जसे कोरोनाचे पीक आले होते, त्याच धर्तीवर कोरोनाबाधितांच्या संख्येसह मृत्यूचा टक्का देखील वाढला आहे. ४० मृत्यूची नोंद आज पुन्हा एकदा बघायला मिळाली. जिल्ह्यात कोरोनाचे ४ हजार ७३७ मृत्यू झाले आहेत. तर जिल्ह्यात सक्रिय कोरोनाबाधितांची सख्या ३३ हजार ५७२ वर पोहचली आहे. 

बुधवारी जिल्ह्यात १७ हजार १५५ कोरोना चाचण्या झाल्या. यात २ हजार ९३२ शहरातील तर ग्रामीणमधून ७८२ आणि  जिल्ह्याबाहेरील ३ अशा ३ हजार ७१७ नव्या बाधितांची नोंद झाली. दिवसभरात २ हजार ०९८ जणांनी कोरोनावर मात केली. यामुळे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या १ लाख ६५ हजार ७१ वर  पोहचली आहे. शहरात २६, ग्रामीण भागात ११ तर जिल्ह्याबाहेरील ३ अशा एकूण ४० जणांचा कोरोनाने बळी घेतला.

यामुळे कोरोनाच्या मृत्यूचे सावट पुन्हा एकदा गडद होणार असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात ३३ हजार ५७२ सक्रिय कोरोनाबाधित आहेत. यातील  २५ हजार ५३५ जणांना कुठलेही लक्षणे नाहीत. यामुळे  ते गृहविलगीकरणात आहेत. तर सौम्य, मध्यम व तीव्र अशी लक्षणे असलेले ४ हजार ३२० जणांना मेडिकल, मेयो, एम्ससह विविध खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

५० हजाराने वाढत गेली बाधितांची संख्या

  • ११ मार्च ते १२ सप्टेंबर २०२० ः  ५० हजार १२८
  • १३ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०२० ः १ लाख ०२ हजार ७८६ 
  • १ नोव्हेंबर (२०२०) ते २८ फेब्रुवारी (२०२१) - १ लाख ५० हजार ६६५
  • १ मार्च ते २४ मार्च २०२१ ः २ लाख ०३ हजार ४८८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bageshwar Dham Update : Video - बागेश्वर धामबद्दल मोठी बातमी, सर्व कार्यक्रम रद्द ; आता धीरेंद्र शास्त्रींनी केले ‘हे’ आवाहन!

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

एनटीपीसी प्रकल्पग्रस्त मिथूनची आत्महत्या! खासदार प्रणिती शिंदेंच्या समजुतीनंतर १२ तासांनंतर नातेवाईकांनी मृतदेह घेतला ताब्यात, प्रणिती म्हणाल्या....

Pune News : एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'च्या घोषणेने वादाला तुटले तोंड

SCROLL FOR NEXT