Oxygen capacity has tripled due to automated oxygen delivery system in Nagpur Medical
Oxygen capacity has tripled due to automated oxygen delivery system in Nagpur Medical 
नागपूर

मेडिकलमध्ये ऑक्सिजन क्षमता वाढली तिप्पट; वितरण प्रणाली स्वयंचलित

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची गरज अधिक असते. यामुळे सप्टेंबर २०२० मध्ये ऑक्सिजनचा तुटवड्यासह वितरण प्रणालीत बिघाड आला होता. पुरवठ्याची गती मंद झाली होती, ही बाब दै. सकाळने पुढे आणली होती. यानंतर प्रशासनाने ऑक्सिजनची क्षमता वाढवण्याचा प्रकल्प हाती घेतला. ऑक्सिजन वितरण प्रणाली स्वयंचलित असल्याने पुरवठ्यादरम्यान एक लाईन बंद पडल्यानंतर तत्काळ दुसऱ्या मार्गाने पुरवठा आपोआप सुरू होतो, हे विशेष.

नागपूरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 
 
मेडिकलमधील कोविड रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तीन रुग्ण मृत्यू पावले. हा प्रकार रविवारी पहाटे समोर आल्याने ऑक्सिजन पुरवठा करणारी स्वयंचलित यंत्र आपोआप बदलण्यात आली. त्याची वेळ पहाटे ४ वाजून ३० मिनिटांची होती. तर या तीन रुग्णांचे मृत्यू सकाळी ६ वाजून ३० मिनीट ते ७ या वेळेतील आहेत. यावेळी या वॉर्डात पाच ते सात रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. सर्वच रुग्णांचा मृत्यू होणे अपेक्षित होते, परंतु तसे झाले नाही. यावरून तिघांचा मृत्यू ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने होणे शक्य नाही, असा प्राथमिक अहवाल सत्यशोधन समितीकडून पुढे आला.

केवळ नातेवाइकांच्या संशयकल्लोळाचे हे वातावरण निर्माण झाले असल्याची बाब पुढे आली आहे. यातील तिघांपैकी दोघांना हृदयविकार होता. मेडिकलच्या बाह्यरुग्ण व कॅज्युअल्टीत आणताना ते व्हेंटिलेटवर होते. यांच्या ऑक्सिजनची पातळी ५६ ते ६६ वर आली होती. तर तिसरा रुग्ण डायलिसिसवर होता. यामुळे त्यांच्या मृत्यूचे कारण दुसरे होते, असे स्पष्ट झाले. अधिष्ठातांनी नेमलेल्या सत्यशोधन समितीमध्ये औषधशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत पाटील, श्वसनविकार विभाग प्रमुख डॉ. सुशांत मेश्राम, भूलरोग विभाग प्रमुख डॉ. वासुदेव बारसागडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे आहेत.
 
६० ‘केएल’ पर्यंत क्षमता 

मेडिकल उपचारादरम्यान रुग्णांसाठी २० ‘केएल’ क्षमतेचा एकच प्लान्ट होता. यामुळे कोविड हॉस्पिटल तयार झाल्यानंतर ऑक्‍सिजनचा तुटवडा जाणवत होता. कोरोना काळात ऑक्सिजनची प्रचंड गरज वाढली आहे. ही बाब दै. सकाळने पुढे आणल्यानंतर ऑक्सिजन क्षमता ६० ‘केएल’ पर्यंत वाढली आहे. अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवरील रुग्णाला १०० टक्के अर्थात २० लिटर ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यात मेडिकलमधील ऑक्सिजन प्रणाली सक्षम आहे. आधुनिक यंत्रणेद्वारे गंभीर रुग्णांना ऑक्‍सिजनचा पुरवठा करण्यासाठी मेडिकल, कोविड हॉस्पिटलमध्ये ‘सेंट्रलाइज ऑक्‍सिजन सप्लाय सिस्टिम' तयार केली आहे. याद्वारे हा पुरवठा होतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

IPL Toss Fixing : कॅमेरा टॉसकडे जाताच रेफ्री आला मध्ये; मुंबईचा टॉस पुन्हा वादात, व्हिडिओ होतोय व्हायरल

Rohith Vemula: "रोहित वेमुला दलित नव्हता"; पोलिसांनी बंद केली केस; स्मृती ईराणी, दत्तात्रेय यांना क्लीनचीट

Pakistan Moon Mission: भारताचे 'चांद्रयान' कॉपी करण्यासाठी निघाला PAK, चीनच्या रॉकेटने केले प्रक्षेपित! आता होत आहे ट्रोल

Latest Marathi News Live Update : मुंबई स्थानकावर अमरावती एक्सप्रेसला किरकोळ आग

SCROLL FOR NEXT