नागपूर

आठ रिकामे टँकर घेऊन ऑक्सिजन एक्स्प्रेस रवाना; पहिलीच वेळ

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : आठ रिकामे टँकर घेऊन ऑक्सिजन एक्स्प्रेस (Oxygen Express) सोमवारी मध्यरात्री अंगुलच्या दिशेने रवाना झाली. नागपूरहून रिकामी रॅक (Empty rack) पाठविण्याचा ही पहिलीच वेळ आहे. देशाच्या मध्यभागी असलेल्या नागपूरहून रिक्त टँकर पाठविण्याची व्यवस्था झाल्याने ऑक्सिजन पुरवठ्यात लागणारा वेळ वाचणार असून रुग्णांसाठी ही दिलासादायक बाब आहे. (Oxygen Express departed with eight empty tankers)

देशातील पहिली ऑक्सिजन ट्रेन नागपूरमार्गे धावली. या एक्स्प्रेसमधील टँकरची पहिली खेप मिळण्याचा पहिला मानही नागपूरलाच मिळाला. देशासाठी हा पथदर्शी प्रकल्प ठरला. मुंबईहून रिक्त रॅक पाठविण्यात मोठा वेळ लागत असल्याची व त्यासाठी खर्चही अधिक करावा लागत असल्याने नागपूर स्टेशनवरून रिक्त रॅक पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली होती. प्रथमच नागपूरहून रिक्त ऑक्सिजन एक्स्प्रेस ओडिसाच्या अंगूलला पाठविण्यात आली. तिथून ऑक्सिजन भरून ती गरजेच्या ठिकाणी पाठविण्यात येईल.

ऑक्सिजन एक्स्प्रेस संदर्भातील घटनाक्रम

देशातील पहिली ऑक्सिजन एक्स्प्रेस विशाखापटनमहून २३ एप्रिलला नागपुरात दाखल झाली. या ट्रेनमधून तीन टँकर प्राणवायू नागपूरला मिळाला. त्यानंतर ८, ९, १३, १४ व १५ मे रोजी पोहोचलेल्या ऑक्सिजन एक्सप्रेससह आलेले ४ टँकर नागपूरला मिळाले. १२ मे रोजीसुद्धा नागपूरला ही ट्रेन पोहोचली होती. पण, राज्य सरकारच्या सूचनेनुसार ती थेट पुण्याला पाठवून देण्यात आली.

(Oxygen Express departed with eight empty tankers)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Wari: कोरडिये काष्ठी अंकुर फुटले, येणे येथे जाले विठोबाचे; संतश्रेष्ठ भानुदास महाराजांनी पांडुरंगास हंपीतून आणले पंढरपूरला

Pune News : माता न तू वैरीनी! ३.५ लाखांसाठी ४० दिवसांच्या चिमुकली विकले...पुण्यातील धक्कादायक प्रकार

Thackeray Brothers : ठाकरे बंधू एकत्र आले, पण; कोल्हापुरात शिवसेना -मनसेचे मनोमिलन हेच मोठे आव्हान

Ashadhi Ekadashi 2025 : ऑस्ट्रेलियातील साधकांकडून वारीची साधना, माउलींच्या पालखी सोहळ्यात पूर्ण केली पायी वाटचाल; दोघे करणार परतवारी

Gahininath Maharaj: महाराष्ट्राची दक्षिण काशी असलेल्या पंढरपुरात सरकारने संतपिट स्थापन करावे : गहिनीनाथ महाराज

SCROLL FOR NEXT