Thalassemia Support and Sickle Cell Treatment  sakal
नागपूर

Pediatric Care: थॅलसेमिया-सिकलसेलबाधित बालरुग्णांच्या वेदनांवर फुंकर

Thalassemia Support and Sickle Cell Awareness: थॅलसेमिया आणि सिकलसेलने त्रस्त बालकांच्या वेदना कमी करण्यासाठी उपयुक्त उपाययोजना आणि मदतीचा आढावा.

सकाळ वृत्तसेवा

Pain Relief For Thalassemia and Sickle Cell Affected Children: रक्ताशी निगडित आनुवंशिक सिकलसेल आजाराचा गड असलेल्या विदर्भात रुग्णांना एकाच छताखाली अद्ययावत उपचारातून या आजाराचे निर्मूलन व्हावे. हे शासनाचे ध्येय असून खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्य व कौशल्य विकास क्षेत्रातील अग्रगण्य स्वंयसेवी संस्थेच्या सहकार्यातून सिकलसेलशी झुंजणाऱ्या बालरुग्णांच्या वेदना कमी करण्याचा आराखडा तयार केला आहे.

सिकलसेल, थॅलसेमिया हा गरिबांचा दुर्लक्षितांचा आजार, अशी ओळख निर्माण झाली आहे. यासाठी एक्सलंस सेंटर तयार करण्यावरही भर देण्यात आला होता. दरम्यान भावी पिढीला या आजारातून मुक्त करण्यासाठी त्यांचे आरोग्य सुदृढ व्हावे या उद्देशाने सिकलसेल, थॅलेसेमियाचे निर्मुलन होऊन त्या बालरुग्णांना वेळेत उपचार उपलब्ध व्हावेत, यासाठी फडणवीस सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. आनंदाची बाब अशी की, या प्रयत्नांना यश येत असून सेवाभावी संस्था स्वतः पुढाकार घेऊन बाल रुग्णांच्या आरोग्यासाठी आरोग्यदायी उपक्रमात सहभागी झाल्या आहेत.

३२४ बालरुग्णांवर उपचार

गेल्या वर्षभरात थॅलेसेमियाच्या १४८ व सिकलसेलच्या १७६ बालरुग्णांवर डॉ. रुघवानी यांच्या केंद्रात उपचार करण्यात आले. तसेच दरवर्षी साधारण सिकलसेलग्रस्त ३०० बालरुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत.

विदर्भातील ११ जिल्ह्यांत राबविणार उपक्रम

नागपूरचे डॉ. विंकी रुघवानी २०१० सालापासून समर्पणाच्या भावनेतून थॅलसेमिया व सिकलसेल निर्मूलनाचा सेवाभावी उपक्रम राबवीत आहेत. नागपुरातील थॅलसेमिया आणि सिकलसेल सेंटर, हे थॅलसेमिया आणि सिकलसेल सोसायटी ऑफ इंडिया संस्थेद्वारे चालविण्यात येतात. या उपक्रमातून डॉ. रुघवानी यांच्या सेवाभावी उपक्रमाला आर्थिक बळ देऊन थॅलसेमिया आणि सिकलसेलबाधित मुलांवर नियमित उपचार करण्यात येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवले ब्रिजवरील वाहतूक ३ तासांनी सुरू; कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर, आंदोलकांमध्ये तीव्र नाराजी

Mumbai Indians Playoff Scenario: मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात? आता काही केलं तरी प्ले ऑफमध्ये पोहोचणे अशक्य; हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर सवाल, CSK चं काय?

How Mumbai Indians Still Qualify for Playoff? हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघ नेमका कुठे कुठे चुकला? मुंबई इंडियन्सला १४ गुणांसह अव्वल चार मध्ये पोहोचता येईल का?

Dhamangaon Blaze: नागपूरमधील धामणगाव विद्यामंदिर गावात भीषण आग, ३०-४० घरे जळून खाक, लाखोंचे नुकसान

गोव्यात दारू प्यायल्यावर जास्त नशा का चढत नाही? ९९ टक्के लोकांना खरं कारण माहित नाही...

SCROLL FOR NEXT