Pali literature analyst Dr. Vimalkirti passed away
Pali literature analyst Dr. Vimalkirti passed away 
नागपूर

पाली साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. विमलकीर्ती यांचे निधन

केवल जीवनतारे

नागपूर  ः आंबेडकरी चळवळीतील सुप्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत, साक्षेपी लेखक, अनुवादक तसेच पाली साहित्याचे अभ्यासक, प्रभावी वक्ते, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पाली पाकृत विभागाचे माजी विभागप्रमुख व आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ. विमलकीर्ती यांचे आज दुपारी निधन झाले. मृत्यूसमयी ते ७१ वर्षांच्या होते. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुली तसेच बराच मोठा आप्त परिवार आहे.

डॉ विमलकीर्ती यांचे मूळ नाव एल. जी. मेश्राम. सद्या नागपुरातील पन्नासे ले-आउट (त्रिमूर्ती नगर) येथे राहात होते. मात्र मूळचे भंडारा जिल्ह्यातील देवरीदेव या गावातील. ५ फेब्रुवारी १९४९ साली त्यांचा जन्म झाला. शिक्षणासाठी ते नागपुरात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छप्पन्नच्या धम्मक्रांतीने प्रेरित झाल्यानंतर त्यांनी पाली विषयातून शिक्षण घेतले. 

विशेष असे की, जागतिक कीर्तीचे बौद्ध भिक्खू डॉ. भदंत आनंद कौशल्यायन यांच्या हस्ते १९७१ साली बौद्ध धम्माची उपसंपदा घेतली. त्यानंतर त्यांना भन्ते आनंद कौसल्यायन यांनी विमलकीर्ती नाव दिले. तेव्हापासून ते विमलकिर्ती या नावाने त्यांची ओळख निर्माण झाली. भदंत आनंद कौशल्यायन यांचे सर्व बौद्ध साहित्य प्रकाशित करण्याचे काम डॉ. विमलकीर्ती यांनी केले. आतापर्यंत पाली, मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील पुस्तके लिहून प्रकाशित केली आहेत. 

पाली साहित्यावर डॉ. विमलकीर्ती यांची पकड होती. पाली साहित्यावरील प्रभाव त्यांच्या बोलण्यातून वेळोवेळी यायचा. त्यात सहजता असे. पाली साहित्याचा त्यांचा व्यासंग होता. पाली पाकृतचा इतिहास सांगताना पौराणिक वचनांची उदाहरणे त्यांच्या वक्तृत्वातून झळकत. त्यांच्या साहित्याचे सर्वाधिक प्रकाशन दिल्ली येथील सम्यक प्रकाशनतर्फे प्रकिशित करण्यात आले.

डॉ. विमलकीर्ती यांचे पहिले पुस्तक १९७९ मध्ये ‘स्वतंत्र मजूर पक्ष’ नावाने प्रकाशित झाले. यानंतर धर्मांतर ः प्रेरणा आणि प्रयोजन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आधुनिकता, पाली सिक्खापक ः पठमो भागो, बौद्ध धर्मे के इतिहासमे डॉ. आंबेडकर इनका योगदान, धर्मांतरी आवश्यक्ता क्यो, बौद्ध संस्कृती भारत, सतसार इशारा, वज्रसूची, देश के दुश्मन, हिंदू कोड बिल या पुस्तकांच्या लेखनासह मिलिंद प्रश्न, या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला. 

याशिवाय ससाई ः जापान से भारत, बौद्धमत, बुद्ध का दर्शन, बाबासाहेब आंबेडकर के पत्र, पाली व्याकरण, पाली त्रिपिटक, ललित विस्तर, दीघनिकाय, महावंस, चुलवंस, दीपवंस, बोधीचर्यावतार अशा पुस्तकांसह महात्म ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चिंतनावर साहित्य खंड प्रकाशित करणारे लेखक म्हणून त्यांचे आंबेडकरी चळवळीत मोठे योगदान आहे. त्यांनी बौद्ध साहित्याचे चिंतन घडविले.

तथागतांची करुणा ही विश्वशांतीला लाभलेले वरदान आहे, अशी मांडणी करणाऱ्या डॉ. विमलकीर्ती यांचे हिंदी साहित्य मोठ्या प्रमाणात प्रकाशित झाले आहे. जेवढे स्पष्टवक्ते, तेवढेच लाघवी. जितके कर्तव्यकठोर ही डॉ. विमलकीर्ती यांची स्वभाववैशिष्ट्ये आंबेडकरी चळवळीत अनेकांच्या स्मरणात असतील. आजच्या अस्वस्थ वर्तमानात एक दिशादर्शक आणि तीक्ष्ण ज्ञानसाधक पाली साहित्याच्या निधनाने समाजाची मोठी हानी झाली आहे. माजी आमदार उपेंद्र शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा घेण्यात आली.

८१ पुस्तकांचे धनी

बौद्ध धम्मग्रंथ असलेल्या त्रिपिटकाला उघडपणे मांडण्याचे काम डॉ. विमलकीर्ती यांनी केले. यासोबतच मोग्गलान पाली व्याकरण, पाली काव्यधारा, बौद्ध संस्कार जीवनपद्धती, श्रमण संस्कृती बनाम ब्राम्हणी संस्कृती, भगवान बुद्ध प्रेरणादायी जीवन, थेरीगाथा या पुस्तकाच्या लेखनासह धम्मपदाचा मराठी अनुवाद डॉ. विमलकिर्ती यांनी केला. आतापर्यंत सुमारे ८१ पुस्तकांचे लेखन आणि अनुवाद त्यांनी केला. 

संपादन : अतुल मांगे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT