RTE e sakal
नागपूर

पालकांनो! RTE प्रवेशावेळी समस्या आल्यास 'इथं' करा तक्रार

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : आरटीई अंतर्गत (RTE) प्रवेश देताना शाळांनी अवास्तव दाखले, प्रमाणपत्रांची मागणी करून त्रास दिल्यास आरटीई ॲक्शन कमिटीकडे (rte action committee) तक्रार करा, असे आवाहन कमिटीचे अध्यक्ष शाहीद शरीफ यांनी केले आहे. (parents can filed complaint to rte action committee about admission)

आरटीईअंतर्गत प्रवेश प्रक्रियेसंदर्भात मंगळवारी पटवर्धन शाळेत उपशिक्षणाधिकारी भास्कर झोडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. शिक्षण विभागाकडून लॉटरीपद्धतीने भरण्यात येणाऱ्या १ हजार ८४८ जागांबाबत माहिती देण्यात आली. एकूण विद्यार्थ्यांपैकी १ हजार २८ पालकांनी आवश्यक दस्तऐवज सादर केले आहे. त्याच आधारे विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आली. याशिवाय पालकांना प्रवेश प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. घटस्फोटीत महिलांचे पाल्य, जाती प्रमाणपत्र, जन्म तारीख यासह अन्य त्रुटींवर चर्चा करण्यात आली.

पालकांकडून शाळांनी ऑनलाइन स्वरूपात कुठलेही शुल्क आकारू नये, प्रॉस्पेक्ट घेतले नाही म्हणून विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जाऊ नये या पालकांकडून करण्यात आलेल्या मागण्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी मान्य केल्या. पालकांनी सर्वप्रकारची साशंकता सोडून आवश्यक कागदपत्र शाळेत जमा करावीत. शाळांनी ते अमान्य केल्यास किंवा वेठिस धरण्याचा प्रयत्न केल्यास कमिटीकडे तक्रार करण्याचे आवाहन शाहिद शरीफ यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: सून सासरच्यांचा सांभाळ करण्यास बांधील नाही; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, वारसा हक्क आणि पोटगी वेगवेगळे

Pune Rain Update : पुण्यात अवकाळीची एन्ट्री; बाणेरमध्ये गारांचा पाऊस, उकाड्याने हैराण पुणेकरांना दिलासा

Latest Marathi News Live Update : भारत सरकारकडे पुरेसा गॅस, इंधनसाठा उपलब्ध : छगन भुजबळ

Political Statement : नशेखोरांविरोधात रस्त्यावर उतरणार; राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इद्रिस नायकवडी यांचा इशारा

Ajinkya Rahane: KKR चे 25 कोटी पाण्यात ग्रीनच्या 'नो बॉलिंग'ने कोलकात्याचं गणित बिघडलं; रहाणेंचं उत्तर ऐकून चाहते थक्क!

SCROLL FOR NEXT