parvati naga 
नागपूर

कोरोनाचा "हॉटस्पॉट' ठरलेल्या पार्वतीनगरवर ओढवले नवे संकट... वाचा

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोना रुग्णाच्या मृत्यूमुळे नवे "हॉटस्पॉट' ठरत असलेल्या पार्वतीनगर परिसर महापालिकेने सील करत जीवनावश्‍यक वस्तुंची दुकानेही दुपारपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहे. एवढेच नव्हे तर या क्षेत्रात फिरणाऱ्या नागरिकांना थेट विलगीकरण केंद्रात पाठविण्यात येणार आहे. त्याचवेळी पार्वतीनगरात पाणीपुरवठा करीत असलेल्या टॅंकरला जलकुंभ परिसरातील नागरिकांचा विरोध होत आहे. त्यामुळे जीवनावश्‍यक वस्तुंसह पाण्याबाबतही पार्वतीनगरवासींवर संकट ओढवले आहे. 

पार्वतीनगरात एका कोरोनाबाधित तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी धंतोली झोन परिसरात होजिअरी, स्टेशनरी दुकाने तसेच बांधकाम सुरू करण्याबाबत दिलेली शिथिलता रद्द केली. धंतोली झोनमधील पार्वतीनगर प्रभाग सिल केला. यात रेल्वे कॉलनीची सिमा, मौर्य सभागृह, प्रबुद्ध बौद्ध विहार रामेश्‍वरी रोड, त्रिशरण चौक, रेल्वे कॉलनी जलकुंभ हा संपूर्ण भाग सिल करण्यात आला. प्रतिबंधित क्षेत्रातील जीवनावश्‍यक वस्तुंची दुकाने सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंतच सुरू राहणार आहे. एवढेच या भागात फिरणाऱ्या नागरिकांना थेट विलगीकरण केंद्रात रवाना करा, असे निर्देश आयुक्तांनी दिले आहे.

जीवनावश्‍यक वस्तू खरेदीसाठी अनेक बंधनाचा सामना येथील नागरिकांना करावा लागत आहे. अनेकांना या भागातील दुकाने सकाळ ते दुपारपर्यंत सुरू राहणार असल्याचे माहित नसल्याने आज तारांबळ उडाली. पार्वतीनगरात कोरोनाचा वाढत्या प्रभावाच्या वृत्तामुळे पाणीपुरवठा करणारे टॅंकरलाही जलकुंभ परिसरातील नागरिक मज्जाव करीत आहे. 

पाण्याच्या संकटला द्यावे लागणार तोंड 
पार्वतीनगरात रेशीमबाग येथील जलकुंभावरून 12 टॅंकरने पाणीपुरवठा केला जातो. परंतु कोरोनाबाधिताच्या मृत्यूमुळे रेशीमबाग जलकुंभ परिसरातील नागरिकांनी टॅंकर रोखले. पार्वतीनगरात जाणारे टॅंकर आमच्या परिसरात नको, अशी भूमिका रेशीमबागेतील नागरिकांनी घेतली. त्यामुळे रेशीमबाग जलकुंभावरून पार्वतीनगरात जाणारे टॅंकर आता म्हाळगीनगर, भांडेवाडी व बुधवारी बाजार जलकुंभाकडे वळविले. या तिन्ही जलकुंभावरून प्रत्येकी चार टॅंकर पार्वतीनगरात पाठविण्यात येत आहे. परंतु या तिन्ही भागातील नागरिकांनी विरोध केल्यास पार्वतीनगरवासींना पाण्याच्या नव्या संकटालाही तोंड द्यावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New ST Buses Decision : सतेज पाटलांनी मागणी करताच राज्य सरकार नवीन आठ हजार एसटी बसेसची खरेदी करणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Nagpur Street Food Price Hike : इराण-इस्रायल युद्धाचा नागपूरकरांना झटका! उद्यापासून तर्री पोहे आणि समोसा खाणे महागणार; पाहा काय आहेत नवीन दर?

Women Cricket: क्रिकेटमधील महिलांचा उत्साह दुपटीने वाढला; भारतातील १४ राज्यांचा सर्व्हे, युवा खेळाडूंची पावले सरसावली

Rural LPG Crisis News:गॅस टंचाईमुळे ग्रामीण भागात पुन्हा पेटल्या चुली; महिलांची अडचण वाढली; धूरमुक्त स्वयंपाकघर पुन्हा धुरकट

कसं झालेलं दादा कोंडके यांचं निधन? महाराष्ट्राच्या 'सोंगाड्या'च्या मृत्यूचं कोडं कधीच सुटलं नाही

SCROLL FOR NEXT