crime sakal
नागपूर

Crime : पाय लागला म्हणून प्रवाशाला धावत्या ट्रेनमधून फेकले; घटनेने खळबळ

आपल्यापैकी अनेकांनी किरकोळ कारणावरून वाद झाल्याच्या अनेक घटना बघितल्या असतील किंवा ऐकल्या असतील.

सकाळ डिजिटल टीम

Nagapur Youth Died In Running Train : आपल्यापैकी अनेकांनी किरकोळ कारणावरून वाद झाल्याच्या अनेक घटना बघितल्या असतील किंवा ऐकल्या असतील. मात्र, रेल्वे प्रवासादरम्यान पाय लागला म्हणून प्रवाशाला धावत्या रेल्वेतून डखलून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत शेख अकबर या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. नागपूरच्या बुट्टीबोरी ते गुमगाव दरम्यान ही धक्कादायक घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अकबर नावाचा प्रवासी नागपूरमध्ये उरुस पाहण्यासाठी रेल्वेने नागपूरकडे निघाला होता. त्यावेळी अकबरचा पाय दुसऱ्या प्रवाशाला लागला. याचा राग आल्याने संतप्त प्रवाशाने अकबरला धावत्या ट्रेनमधून फेकून दिले. यामध्ये अकबर याचा मृत्यू झाला असून, पोलिसांनी या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

अकोल्यातील काही तरूण नागपूर येथील उरुसासाठी गरिबरथ रेल्वेने निघाले होते. जनरल डब्ब्यात मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने हे सर्व तरूण दराजवळ उभे होते. त्यावेळी एकाचा पाय दुसऱ्या तरूणाला लागला. याचं रुपांतर दोन गटांमध्ये वादात झाले आणि दुसऱ्या गटातील एका व्यक्तीने अकबर याला धावत्या ट्रेनमधून धक्का दिला. ही बाबत अकबर याच्या सोबत असलेल्या मित्रांनी रेल्वे पोलिसांना दिली असता पोलिसांनी तपासाची सूत्र हलवत एका संशयिताला एटक केली आहे. तसेच इतर आरोपींचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचाही यादीत समावेश; मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारचा निर्णय

Central Railway: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर ७५ दिवसांचा विशेष ब्लॉक, मेल/एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल

Retirement Planning: रिटायरमेंटनंतर आरामात जगण्यासाठी 1.5 कोटी पुरेसे नाही? HDFC पेन्शनच्या अहवालातून मोठा खुलासा

Marathi News Live Updates: पुण्यात राष्ट्रीय समाज पक्षातर्फे सोशल मीडिया प्रबोधन शिबीर

Community Book Bank: ममदापुरात लोकसहभागातून जिल्हा परिषद शाळेत बुक बँक सुरू; ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी अवांतर वाचनाचे नवे दालन

SCROLL FOR NEXT