कोरोना  
नागपूर

या..या १० हजारात कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र घेऊन जा; नागपुरात रॅकेट सक्रिय? राष्ट्रवादीचा आरोप 

योगेश बरवड

नागपूर ः खासगी पॅथॉलॉजी लॅबकडून नागरिकांची अडवणूक करीत पैसे उकळले जात आहेत, दहा हजारात कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींना निगेटिव्ह प्रमाणपत्राची विक्री केली जात असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर प्रवक्ते श्रीकांत शिवणकर यांनी आज पत्रकार परिषदेत केला. मनपाच्या निष्क्रियतेमुळे हा गोरखधंदा फोफावला असल्याचे त्यांनी सांगितले.

विदेशात जाणारे किंवा नोकरीवर रुजू होणाऱ्यांना कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. याच स्थितीचा फायदा घेण्यासाठी काही प्रतिष्ठित लॅब सरसावल्या आहेत. संगनमताने प्रमाणपत्रावर भविष्य अवलंबून असणाऱ्यांवर जाळे फेकून पैसे उकळले जात आहेत. अशाच एका प्रकरणाचा खुलासा शिवणकर यांनी केला. 

नागपूरच्याच २९ वर्षीय युवकाला दुबईला जायचे होते. यासाठी ४८ तासांपूर्वीचे कोरोना निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र सादर करायचे होते. त्याने ११ मार्चला रामदासपेठेतील प्रसिद्ध प्रयोगशाळेत जाऊन तपासणी केली. अहवाल येण्यापूर्वीच तो हैदराबादला निघून गेला. तिथूनच त्याचे विमान होते. 

दुसऱ्या दिवशी अहवाल पॉझिटिव्ह आला. काही वेळाने याच प्रयोगशाळेतून फोन आला. दहा हजार रुपये दिल्यास निगेटिव्ह अहवाल देण्याची तयारी दर्शविली. युवकाने पैसे ट्रान्स्फर करताच धंतोलीतील एका प्रसिद्ध लॅबचा कोरोना निगेटिव्ह असल्याचा अहवाल त्याला पाठविला गेला. वास्तविक सदर युवक हैदराबादला असताना त्याचे स्वॅब घेतले कसे, तपासणी केली कधी हा सर्वात मोठा प्रश्न आहे. 

महापालिकेनेही लक्ष घालून या प्रकाराला आळा घालावा अन्यथा कायदा हातात घेण्यासही मागे पाहणार नाही, असा इशारा शिवणकर यांनी दिला. पत्रकार परिषदेला विशाल खांडेकर, अशोक काटले, मेहबूब पठाण उपस्थित होते.

रॅकेट सक्रिय?

निगेटिव्ह प्रमाणपत्राच्या आधारे तो युवक दुबईत गेला. विमानतळावरच पुन्हा तपासणी करण्यात आली. त्यात सुदैवाने तो निगेटिव्ह आढळला. या संपूर्ण प्रकारावरून रॅकेट सक्रिय असल्याची शंका आल्याने त्याने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदविल्याने या गोरखधंद्यावरून पडदा उठला. या विषयाची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना दिली आहे. उद्या पोलिस आयुक्तांकडे या प्रकाराची तक्रार दिली जाईल.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Loan Waiver : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून खात्यात जमा होणार पैसे; 56 लाख शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी, बँक खात्यांची पडताळणी सुरू

Pune Metro: आता रस्ता ओलांडणे झाले सुरक्षित! वाकड मेट्रो स्थानकावर ६० मीटरचा पादचारी पूल; नागरिकांसाठी मोफत सुविधा

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहिणींनो लक्ष द्या! तुमच्या बँक खात्यात 1500 ऐवजी जमा होणार 3,000 रुपये? पण 'या' 80 लाख महिलांना बसू शकतो फटका!

Wedding Destination: शोधताय? हिमालयाच्या कुशीतलं हे मंदिर बनतंय नवविवाहितांचं आवडतं ठिकाण, जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Vaibhav Sooryavanshi : वैभवसाठी संजू सॅमसनला बळीचा बकरा का बनवताय? माजी खेळाडूचा संतापजनक सवाल...

SCROLL FOR NEXT