नागपूर

अपघात, आत्महत्या की हत्या?; चौथ्या माळ्यावरून पडल्याने दगावला रुग्ण

केवल जीवनतारे

नागपूर : मेडिकलशी संलग्न सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील (Super Specialty Hospital) चौथ्या माळ्यावरून खाली कोसळल्याने ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू (Death of a senior citizen) झाला. सकाळी नऊ वाजता ही दुर्घटना घडली. तुळशीराम बांगडे (वय ६५) असे ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. (Patient death upon falling from the fourth floor)

तुळशीराम यांच्या किडनीत अडथळा निर्माण झाल्याने मेडिकलशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटीत उपचाराला आले होते. युरॉल़ॉजी विभागात बाह्यरुग्ण तपासण्याचा दिवस असल्याने त्यांच्यावर दुर्बिणीद्वारे लेप्रोस्कोपिक प्रोसिजरही करण्यात येणार होती. तुळशीराम सुपरच्या चौथ्या माळ्यावर आले होते. गर्दी असल्याने ते येथील भिंतीवर बसले. अचानक तोल जाऊन ते कोसळले.

पोर्चमध्ये मोठा आवाज झाल्याने येथील सुरक्षारक्षकांनी धाव घेतली. येथे ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. तातडीने मेडिकलच्या अपघात विभागात नेले. मात्र, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी अजनी पोलिसांनी अकस्मात अपघाती मृत्यूची नोंद घेतली आहे. मात्र, ही आत्महत्या आहे की हत्या या दिशेनेही पोलिसांकडून तपास होण्याची गरज असल्याची जोरदार चर्चा सुपरमध्ये होती.

कॅज्युल्टी नसल्याची खंत

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सकाळी ८ ते १ याच वेळात उपचाराची सोय आहे. केवळ पाच तासांचा बाह्यरुग्ण विभाग येथे आहे. पाच तासात आलेल्या रुग्णांवर उपचार होतात. पुढे सुपरच्या प्रवेशद्वाराला टाळे लावण्यात येतात. येथे २४ तास कॅज्युल्टी असती तर अनेक गरीब रुग्णांचे प्राण वाचवता येतील. मेडिकलमध्ये कॅज्युल्टीमध्ये मोठ्या प्रमाणात भार आहे. सद्या हृदय, गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी या दोन विषयात येथे शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू झाले. वरिष्ठ निवासी डॉक्टरांची येथे सोय आहे, यामुळे किमान या दोन विभागासाठी कॅज्युल्टीची सोय सुपरमध्ये असावी, असा सूर काही जाणकारांमध्ये उमटला आहे.

(Patient death upon falling from the fourth floor)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Vijay Pandit : अपयशातून घडविले खाकीचे नवे शिलेदार! विजय पंडित यांना १३ वेळा अपयश, तरीही ४० जणांना वर्दीचे धडे

Raj Thackeray : जिथे जाल तिथे मराठीतच बोला; राज ठाकरे यांनी मांडला 'स्वप्नातील महाराष्ट्र'

GT vs RCB Live: रजतची विकेट वादग्रस्त ठरली... विराट कोहलीची सटकली! गुजरातच्या गोलंदाजांनी गतविजेत्यांची वाट लावली Video

SCROLL FOR NEXT